शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी महामाेर्चा निघणारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

ठिकठिकाणी बैठका घेऊन माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन केले जात आहे. माेर्चाला परवानगी मिळावी, यासाठी पाेलीस प्रशासनाकडे अर्ज केला हाेता. मात्र पाेलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ओबीसी समाजात माेर्चाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते. माेर्चा निघणार की नाही, याविषयी शंका-कुशंका उपस्थित केल्या जात हाेत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ओबीसी समन्वय समितीची तातडीची बैठक रविवारी पार पडली. 

ठळक मुद्देसमन्वय समितीच्या बैठकीत निर्धार; सहभागी हाेण्याचे आवाहन

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेनाचे कारण पुढे करीत पाेलीस प्रशासनाने माेर्चाला परवानगी देण्यास नकार दिला असला तरी २२ तारखेचा नियाेजित माेर्चा निघेलच, असा निर्धार १४ फेब्रुवारी राेजी पार पडलेल्या ओबीसी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत व्यक्त केला आहे. २२ तारखेचा ओबीसींचा माेर्चा ऐतिहासिक व्हावा, यासाठी ओबीसी समाज संघटना मागील १५ दिवसापासून कामाला लागली आहे. ठिकठिकाणी बैठका घेऊन माेर्चात सहभागी हाेण्याचे आवाहन केले जात आहे. माेर्चाला परवानगी मिळावी, यासाठी पाेलीस प्रशासनाकडे अर्ज केला हाेता. मात्र पाेलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने ओबीसी समाजात माेर्चाविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले हाेते. माेर्चा निघणार की नाही, याविषयी शंका-कुशंका उपस्थित केल्या जात हाेत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय ओबीसी समन्वय समितीची तातडीची बैठक रविवारी पार पडली. या बैठकीत माेर्चाविषयी चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच सदस्यांनी माेर्चा निघेलच, असा सर्वानुमते निर्णय घेतला.  माेर्चा अतिशय शांततेत काढला जाईल, माेर्चेकरी काेराेना प्रतिबंधाविषयीचे नियम पाळतील. यादृष्टीने प्रयत्न केले जातील. शांततेच्या मार्गाने सरकारला ओबीसी समाजाची ताकद, ऐक्य दाखवायचे आहे. त्यादृष्टीने सर्व ओबीसी बांधवांनी मनात काेणतीही शंका न बाळगता माेर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीच्या सदस्यांनी केले आहे. बैठकीला जिल्हाभरातील ओबीसी समाज संघटनांचे प्रतिनिधी हजर हाेते.

शेतकरी माेर्चालाही परवानगी नाहीकाेराेनाच्या पार्श्वभूमीवर सरकार काेणत्याच माेर्चाला परवानगी देत नाही. एवढेच नाही तर दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या माेर्चालासुद्धा परवानगी नाही, तरीही हा माेर्चा मागील महिनाभरापासून सुरू आहे. जिल्ह्यात मागील तीन महिन्याच्या कालावधीत एकाही माेर्चाला परवानगी नव्हती. तरीही हजाराेच्या संख्येतील माेर्चे काढण्यात आले आहेत. एकाही माेर्चेकऱ्यावर प्रशासनाने कारवाई केली नाही. उलट पाेलीस बंदाेबस्त ठेवून माेर्चा शांततेत पार पडेल, यासाठी सहकार्य केले असल्याचे दिसून येते. ओबीसी समाज संघटनेने माेर्चाची परवानगी मागितली हाेती. त्याला उत्तर म्हणून प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. हा एक नियमाचा भाग आहे. मात्र याला ओबीसी समाजाने घाबरून जाऊ नये. पाेलीस विभाग व इतर विभागसुद्धा माेर्चा शांततेत पार पाडण्यास सहकार्य करतील, अशी अपेक्षा बैठकीतील सदस्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चा