शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

पोषण आहार कर्मचाऱ्यांची खासदारांच्या कार्यालयावर धडक

By admin | Updated: May 18, 2016 01:33 IST

केंद्र शासनाच्या केंद्रीय स्वंयपाकगृह प्रणाली (सेन्ट्रल किचन) मार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार देणार असल्याने कार्यरत पोषण आहार कर्मचारी

आक्रोश मोर्चा : केंद्र सरकारच्या सेंट्रल किचन योजनेचा केला विरोध; सेवेत कायम करागडचिरोली : केंद्र शासनाच्या केंद्रीय स्वंयपाकगृह प्रणाली (सेन्ट्रल किचन) मार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार देणार असल्याने कार्यरत पोषण आहार कर्मचारी व महिला बचत गटांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रखरखत्या उन्हात शेकडो पोषण आहार कर्मचाऱ्यांनी आयटकच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन आमदार, खासदार यांच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, राज्य कौन्सिल सदस्य वनिता कुंठावार, श्रीधर वाढई, भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, श्रीधर वाढई, अ‍ॅड. जगदिश मेश्राम, कुंदा कोहपरे, मोरेश्वर डांगे, संध्या वासेकर, शंभू निकुरे, कल्पना रायपुरे, कुंदा चलीलवार, सारीका वांढरे, रूपाली हेडाऊ, गणेश चापले आदींनी केले. मोर्चेकरांच्या वतीने खासदार अशोक नेते यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सेवेत कायम करण्यात यावे, वेतन श्रेणी, मानधन, कामावरून कमी करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, अतिरिक्त कामे देणे बंद करावे, गॅस सिलिंडरचा पुरवठा करावा, करारनाम्यानुसार गणवेश वर्षातून दोनवेळा देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १२ महिन्याचे मानधन व वयाच्या ६० वर्षानंतर पाच हजार रूपये पेन्शनचा कायदा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. खासदार अशोक नेते यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारून शासनस्तरावर योग्य पाठपुरावा करू, असे आश्वासन या पाकर्मचाऱ्यांना दिले. (नगर प्रतिनिधी)