आतापर्यंत जिल्ह्यात २८ हजार ९०६ जण बाधित झाले. त्यापैकी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या २६ हजार ६८७ वर पोहोचली आहे. २ नवीन मृतांमध्ये ७१ वर्षीय पुरुष विसापूर गडचिरोली, ६८ वर्षीय पुरुष व्याहाड, ता.सावली जि.चंद्रपूर यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोनारूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३२ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण ५.२६ टक्के तर मृत्यूदर २.४२ टक्के झाला आहे.
नवीन १४३ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ३९, अहेरी २५ आरमोरी ५, चामोर्शी तालुक्यातील ३०, धानोरा तालुक्यातील ६, एटापल्ली तालुक्यातील ९, कोरची तालुक्यातील २, कुरखेडा तालुक्यातील ५, मूलचेरा तालुक्यातील ७, सिरोंचा तालुक्यातील ११ तर देसाईगंज तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे. कोरोनामुक्त झालेल्या २३५ रूग्णांमध्ये गडचिरोलीमधील ६९, अहेरी ३६, आरमोरी १८, भामरागड ३, चामोर्शी ४२, धानोरा १०, एटापल्ली ५, मूलचेरा ७, सिरोंचा १६, कोरची ३, कुरखेडा ५ आणि देसाईगंज येथील २१ जणांचा समावेश आहे.