प्राध्यापक संतप्त : वेतन देयकाला बायोमेट्रिक स्लीप जोडावी लागणारदिलीप दहेलकर गडचिरोलीवरिष्ठ महाविद्यालयातील शिस्त कायम ठेवून गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठाअंतर्गत असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली आहे. सदर बायोमेट्रिक मशीनवर सर्व प्राध्यापक व प्राचार्यांनी हजेरी नोंदविणे आवश्यक केले आहे. बायोमेट्रिक मशीनची स्लीप प्राध्यापकांच्या वेतन देयकाला जोडावी लागणार आहे. या निर्णयामुळे चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील प्राध्यापक कमालीचे संतप्त झाले आहे. आता नागपूरच्या विभागीय कार्यालयाची सर्व प्राध्यापकांच्या दैनंदिन उपस्थितीवर थेट नजर राहणार आहे.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात ४२ अनुदानित व १०५ कायम विना अनुदानित असे एकूण १४७ वरिष्ठ महाविद्यालय तर गडचिरोली जिल्ह्यात २५ अनुदानित व ६४ कायम विनाअनुदानित असे एकूण ८९ वरिष्ठ महाविद्यालये आहेत. एकंदरीत गोंडवाना विद्यापीठांतर्गत ६७ अनुदानित व १६९ कायम विना अनुदानित असे एकूण २३६ वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांना प्राध्यापकांसाठी महाविद्यालयात बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्याचे निर्देश गोंडवाना विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी दिले आहे. विद्यापीठांतर्गत बहुतांश अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. दोनदा हजेरी नोंदविणे आवश्यकउच्च शिक्षण विभाग नागपूरच्या सहसंचालकांनी घेतलेल्या निर्णयानुसार १ जुलै २०१५ पासून वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना सकाळी ७.३० व सुटीच्या वेळी दुपारी २.१० वा. या वेळेत दोनदा महाविद्यालयाच्या बायोमेट्रिक मशीनवर हजेरी नोंदविणे आवश्यक झाले आहे.उच्च शिक्षण विभाग नागपूरच्या सहसंचालक डॉ. अंजली रहाटगावकर यांनी सर्व वरिष्ठ महाविद्यालयांना ४ जुलै रोजी पत्र पाठवून बायोमेट्रिक मशीनवरील उपस्थितीची स्लीप दर महिन्याला विभागीय कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश दिले आहे. या बायोमेट्रिक मशीनवर नोंदविण्यात आलेल्या हजेरीनुसार प्राध्यापकांचे वेतन आॅनलाईन प्रणालीद्वारे काढण्यात येणार आहे.
वरिष्ठ प्राध्यापकांच्या दैनंदिन उपस्थितींवर आता थेट नजर
By admin | Updated: July 29, 2015 01:41 IST