शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांनी जंगलात काढली रात्र!

By admin | Updated: August 30, 2015 01:07 IST

आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुडकेली नाल्यावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-लाहेरी बसमधील प्रवाशांना शुक्रवारची रात्र जंगलातच काढावी लागली.

नातेवाईक चिंतेत : कुडकेली नाल्यावरील पाण्यामुळे लाहेरी बस रात्रभर अडकलीभामरागड : आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुडकेली नाल्यावरून पाणी वाहत असल्याने गडचिरोली-लाहेरी बसमधील प्रवाशांना शुक्रवारची रात्र जंगलातच काढावी लागली. सदर बस शनिवारी सकाळी ६ वाजता भामरागड येथे पोहोचली. रात्रभर बस न आल्याने प्रवाशांचे नातेवाईक चिंतातुर झाले होते. शेकडो कर्मचारी, नागरिक भामरागडला जात असल्याने गडचिरोली आगाराने गडचिरोली-लाहेरी ही स्वतंत्र बस सुरू केली आहे. सदर बस लाहेरी येथे मुक्कामी राहते. सदर बस गडचिरोलीवरून दुपारी अडीच वाजता सोडण्यात येते. आलापल्लीला सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पोहोचते. त्यानंतर भामरागडसाठी पुढचा प्रवास सुरू होतो. ही बस लाहेरी येथे रात्री ९ वाजताच्या सुमारास पोहोचते. त्यामुळे या बसने अनेक प्रवासी प्रवास करतात. या बसवर नेहमीच गर्दी राहते. नेहमीप्रमाणेच गडचिरोली आगारातून एमएच-४०८९७९ ही बस २.३० वाजताच्या सुमारास प्रवासी घेऊन निघाली. सायंकाळच्या सुमारास अहेरी, भामरागड तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. त्यामुळे आलापल्ली-भामरागड मार्गावर असलेल्या कुडकेली नाल्यावरील पुलावरून पाणी वाहने सुरू झाले. रात्रीची वेळ होती. त्यामुळे पुलावरून बस टाकल्यास दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेऊन नाल्यावरील पूर उतरेपर्यंत वाट बघण्याचा निर्णय बसचालक बन्सोड, बस वाहक व्ही. मडावी व बसमधील प्रवाशांनी घेतला. लहान नाले असल्याने अगदी तासात पूर ओसरतो, हा या परिसरातील प्रवाशांना आजपर्यंत आलेला अनुभव आहे. मात्र रात्रभर पाऊस पडत असल्याने पूर ओसरला नाही. परिणामी प्रवाशांना पूर ओसरण्याची वाट बघत संपूर्ण रात्र जंगलातच काढावी लागली. पहाटेच्या सुमारास पूर ओसरल्यानंतर सदर बस भामरागड येथे सकाळी ६ वाजता पोहोचली. या बसमध्ये येत असलेल्या तेजस्विनी या मुलीची वाट बघत तिचे आई-वडील रात्रभर भामरागड येथील चौकात थांबले होते. आलापल्लीवरून निघालेली बस रात्रभर न पोहोचल्याने आई-वडील चिंतेत सापडले होते. जंगलात फोनही लागत नसल्याने चिंता आणखीच वाढली होती. या मार्गावर अनेक नाले आहेत. त्यावरील पूल उंचीने अत्यंत ठेंगणे असल्याने असे प्रकार घडत आहेत. याचा प्रचंड त्रास भामरागड तालुक्यातील जनतेला सहन करावा लागत आहे. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)