शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
5
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
6
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
7
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
8
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
9
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
10
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
11
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
12
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
13
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
14
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
15
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
17
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
18
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या रस्त्यावर मुरूम टाकून दाखविला नवीन रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:42 IST

सन २०१५-१६ मध्ये ज्या पांदन रस्त्याचे खडीकरण झाले होते, तोच २०० मीटर रस्ता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरून त्यावर मुरूम पसरवून नवीन रस्ता दाखविला व कंत्राटदाराने पैशाची उचल सुद्धा केली असल्याचा आरोप देलनवाडी येथील नागरिकांनी केला आहे.

ठळक मुद्देदेलनवाडी येथील प्रकार : कंत्राटदारावर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : सन २०१५-१६ मध्ये ज्या पांदन रस्त्याचे खडीकरण झाले होते, तोच २०० मीटर रस्ता ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरून त्यावर मुरूम पसरवून नवीन रस्ता दाखविला व कंत्राटदाराने पैशाची उचल सुद्धा केली असल्याचा आरोप देलनवाडी येथील नागरिकांनी केला आहे.आरमोरी तालुक्यातील देलनवाडी येथील नळ योजनेच्या विहिरीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी २०१८ मध्ये रस्ता मंजूर करण्यात आला होता. जे काम मंजूर झाले, त्यातील पाण्याची टाकी ते विठ्ठल ढोक यांच्या शेतापर्यंतच्या रस्त्यावर गिट्टी, मुरूम टाकून नवीन रस्ता तयार करण्यात आला. मात्र जीवन दडमल ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या रस्त्याचे काम २०१६-१७ मध्येच पूर्ण झाले. त्याचवेळी या रस्त्याचे खडीकरण झाले होते. जुन्या रस्त्यालाच व्यवस्थित ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागरून त्याला नवीन रस्ता दाखविला. रस्त्याच्या कडा बुजविण्यासाठी त्याच ठिकाणची नदी किनाऱ्याची माती खोदल्याने नदी किनाऱ्यांची फार मोठी हानी झाली आहे. या पांदन रस्त्यासाठी व छोट्या पुलाच्या बांधकामासाठी रेती व गिट्टी अवैध खनन करून वापरण्यात आली आहे. त्याचबरोबर पूल व रस्त्याचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या संपूर्ण कामाची चौकशी करावी, अशी मागणी देलनवाडीचे सरपंच माणिक पेंदाम, सेवा सहकारी संस्थेचे उपसभापती रत्नाकर धाईत, माजी सरपंच आबाजी कन्नाके, राहुल धाईत, ईश्वर खांडेकर, भाऊराव घोडमारे, युवराज गेडाम, प्रशांत ढोक, श्यामराव घोडमारे यांनी केली आहे.बांधकाम सुरू असताना बांधकामाची पाहणी करून बिल काढणे ही अभियंत्यांची जबाबदारी आहे. काम झाले नसतानाही बिल निघाले आहे, याचा अर्थ यात अभियंत्यांचा सुद्धा हात असल्याचा आरोप देलनवाडी येथील नागरिकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.