शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नवी इमारत होणार

By admin | Updated: September 6, 2014 23:45 IST

जिल्ह्याच्या परिवहन व्यवस्थेचा कारभार सांभाळणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला राज्य शासनाने १ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली आहे.

आरटीओ कार्यालय : मान्यता मिळाली; ६ कोटी १९ लाखांचे बजेटदिलीप दहेलकर - गडचिरोलीजिल्ह्याच्या परिवहन व्यवस्थेचा कारभार सांभाळणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाला राज्य शासनाने १ फेब्रुवारी २०१४ रोजी प्रशासकीय व तांत्रिक मान्यता दिली आहे. या कार्यालयाच्या इमारतीसाठी गोंडवाना विद्यापीठालगतची जागा अधिग्रहीत करण्यात आली आहे. बांधकामाची ई-निविदा प्रक्रिया पार पडली असल्याने लवकरच या इमारतीच्या बांधकामाला सुरूवात होणार आहे. या इमारतीसाठी ६ कोटी १९ लाख ५८ हजार २८३ रूपयाचा बजेट निश्चित करण्यात आला आहे.जिल्हा निर्मितीनंतर तब्बल ३२ वर्ष उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिनस्त असलेल्या बॅरेकच्या छोट्याशा इमारतीत सुरू आहे. ही इमारत अत्यंत लहान असल्याने येथील अधिकारी, कर्मचारी व वाहनचालकांना त्रास होत आहे. वाहन तपासणी मोहिमेत ताब्यात घेतलेली वाहने पुरेशा जागेअभावी या कार्यालयाच्या पुढे रस्त्याच्या कडेला ठेवावी लागत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कार्यालयाच्या इमारतीची मागणी शासनाकडे होत होती. अखेर राज्यशासनाने या कार्यालयाच्या इमारतीला मंजुरी दिली असून सन २०१४-१५ या वर्षाकरीता इमारतीच्या बांधकामासाठी १ कोटी रूपयाची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी शासनाने गोंडवाना विद्यापीठ व मृद सर्व्हेक्षण कार्यालयाच्या परिसरातील साडेचार एकर जागा अधिग्रहीत केली आहे. या कार्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव प्रशासनाकडे दीड वर्षांपूर्वी सादर करण्यात आला होता. मात्र जागा उपलब्ध होत नसल्याने मान्यता रखडली होती. आता जागा उपलब्ध झाल्याने शासनाने या इमारतीच्या बांधकामास मंजुरी देऊन इमारतीचा प्रश्न मार्गी लावला आहे. परिवहन कार्यालयाच्या नव्या प्रशस्त इमारतीत प्रशासकीय कामकाज कक्ष, अधिकारी कक्ष तसेच वाहन चालविण्याच्या प्रात्याक्षिकासाठी मैदान तयार करण्यात येणार आहे. या नव्या इमारतीत वाहने ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्वसोयीसुविधायुक्त नवे परिवहन कार्यालयाची इमारत होणार असल्याने या कार्यालयाच्या प्रशासकीय कामाला गती मिळणार आहे. या बांधकामाबाबत ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असून कंत्राटदार निश्चित झाले आहे. या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाागाच्या नियंत्रणात खासगी कंत्राटदारामार्फत होणार आहे. सद्य:स्थितीत राज्य शासनाकडून इमारतीच्या बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ३३ लाख रूपये प्राप्त झाले असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. इमारत बांधकामाचे सर्वसोपस्कार पार पडले असल्याने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच या बांधकामाचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. नव्या इमारतीला मान्यता मिळाल्यामुळे जिल्ह्याच्या विकासात आणखी भर पडणार आहे. यामुळे जिल्हावासियांची प्रदीर्घ वर्षाची प्रतिक्षा संपली आहे.