शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

भामरागडच्या समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By admin | Updated: July 31, 2014 00:01 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे अश्रू पुसले

भामरागड : राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याला सध्या समस्येचे ग्रहण लागले आहे. या समस्या सुटण्याचे नावच घेत नाही. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तालुक्यात येऊन पूरग्रस्तांचे अश्रू पुसले व विकासाचे आश्वासन दिले. परंतु हे सारे हवेतच विरले आहे.भामरागडच्या विकासाचे चित्र मात्र बदलले नाही. १०० टक्के आदिवासी गाव असलेला भामरागड हा तालुका आहे. अनेकदा समस्यांच्याबाबत आंदोलन झालीत. परंतु त्यातून काहीही हाती पडले नाही. पावसाळा आला की, इंद्रावती, पामुलगौतम, पर्लकोटा यांना नद्या तुडुंब भरून वाहतात. येथील नागरिकांना पुराचा सामना करावा लागतो. मागील दोन दशकापासून पुराच्या या समस्येमुळे भामरागडचे नागरिक त्रस्त आहेत. १९८६ मध्ये महापूर येऊन भामरागडला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते. भामरागडच्या १०० ते ८० गावाचा संपर्क पुरामुळे दरवर्षी तुटतो. भामरागडच्या बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनाही आपले दुकान हलवावे लागते. पोलीस ठाण्याच्या समोरून पुराच्या पाण्याचा नाला वाहतो व रस्ते बंद होऊन जातात. ठेंगणे व अरूंद पूल असल्याने अनेक दिवस पुलावरचे पाणीही उतरत नाही. आरेवाडा, कोठी येथील नाले भरून वाहत असल्याने रस्ता बंद पडून जातो. नागरिकांना उपचारासाठीसुध्दा भामरागडला येणे पावसाळ्यात कठीण होऊन जाते. मागील २० वर्षापासून ही समस्या आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना अद्याप झालेली नाही. पालकमंत्री उपमुख्यमंत्री २००६ मध्ये येथे आले होते. आढावा बैठक घेतली. पर्लकोटाचा ठेंगणा पूल उंच करण्याचे आश्वासन दिले. परंतु त्यानंतर काहीही झाले नाही. पुराचे पाणी राजे विश्वेश्वरराव चौकापर्यंत येते. ५ दिवस जनजीवन विस्कळीत होते. नव्या पुलाच्या बांधकामाकडे तसेच ठेंगणे व अरूंद रपटे रूंद करण्याकडे लोकप्रतिनिधीचेही दुर्लक्ष आहे. कुमरगडा, ताडगाव, नारगुंडा हे मार्ग दरवर्षीच बंदच होऊन जातात. अनेतदा बांधकाम विभाग तुटलेले पूल व खचलेले रस्ते दुरूस्त करण्यासाठी येत नाही. नागरिक व पोलीस श्रमदान करून रस्ते तयार करतात व कशीतरी बससेवा सुरू करून घेतात. भामरागडच्या या समस्येवर कधीतरी कायम तोडगा निघेल काय, हाच खरा मुख्य प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)