शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

मानवाच्या रक्षणार्थ पर्यावरण संवर्धनाची गरज

By admin | Updated: June 6, 2017 00:48 IST

पर्यावरण व मानवी जीवन यांचा सहसंबंध आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जिवाला धोका होण्याची शक्यता आहे.

जागतिक पर्यावरण दिन : कुरखेडात मान्यवरांचा सूरलोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : पर्यावरण व मानवी जीवन यांचा सहसंबंध आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यास मानवी जिवाला धोका होण्याची शक्यता आहे. मानवी जीवनाच्या सुखासाठी पर्यावरणाचे रक्षण होणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संवर्धन काळाची गरज आहे, असा सूर मान्यवरांनी सोमवारी कुरखेडा वन परिक्षेत्र कार्यालयाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमात काढला. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. कृष्णा गजबे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सहायक वन संरक्षक दीपक चौडीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून जि. प. चे कृषी सभापती नाना नाकाडे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, जि. प. सदस्य प्रल्हाद कराडे, नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी, पं. स. उपसभापती मनोज दुनेदार, पं. स. सदस्य संध्या नैताम, शारदा पोरेटी, विलास गावंडे, गणपत सोनकुसरे, राम लांजेवार, चांगदेव फाये, न. पं. सभापती आशा तुलावी, रवींद्र गोटेफोडे, नगरसेवक अ‍ॅड. उमेश वालदे, शाहेदा मुघल, चित्रा गजभिये, राजन खुणे, नारायण टेंभुर्णे, बंडू लांजेवार, सरपंच शशिकला कुमरे, तुलसी उईके, सहायक वनसंरक्षक कैदलवार, सेवानिवृत्त सहायक वन संरक्षक बावनकर उपस्थित होते. सर्वप्रथम वन परिक्षेत्र अधिकारी शंकर गाजलवार व संयुक्त वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष आशा तुलावी यांच्या नेतृत्त्वात शहरातून वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमात वाकडी येथील दारूबंदी करणाऱ्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वन व कर्मचाऱ्यांचाही सत्कार झाला. वृक्षांना कौटुंबिक सदस्याप्रमाणे समजून त्यांचे जतन करावे, असे आवाहन आ. कृष्णा गजबे यांनी केले. अवैैध वृक्षतोडीमुळे वन क्षेत्राचे प्रमाण कमी होत आहे. प्राणी गावाकडे धाव घेत असल्याने जंगलाचे रक्षण करावे, असे आवाहन नाना नाकाडे यांनी केले. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी वृक्ष लागवड व संवर्धन ही मनुष्याची नैैतिक जबाबदारी आहे. परंतु तो जबाबदारी पार पाडत नसल्याचे दिसून येते, असे सांगितले. यावेळी नगराध्यक्ष मोहबंसी, जि. प. सदस्य कराडे, उपसभापती दुनेदार व सहायक वनसंरक्षक चौडीकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक वन परिक्षेत्राधिकारी गाजलवार, संचालन वनरक्षक गाजी शेख तर आभार क्षेत्र सहायक भडांगे यांनी मानले. यावेळी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.