शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्त व सुदृढ समाज निर्मितीची आवश्यकता

By admin | Updated: November 12, 2014 22:44 IST

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्याची निवड करून तंबाखू मुक्ती कार्यक्रम राबविला जात आहे. शैक्षणिक सत्रात तंबाखू मुक्तीची प्रभावी

गडचिरोली : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्याची निवड करून तंबाखू मुक्ती कार्यक्रम राबविला जात आहे. शैक्षणिक सत्रात तंबाखू मुक्तीची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सर्वच केंद्र प्रमुखांनी शास्त्रोक्त पद्धतीने माहिती घेऊन तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत आपापल्या केंद्रातील शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे, आरोग्यदायी समाज निर्मितीसाठी व्यसनमुक्त व सुदृढ समाज निर्माण करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांचे जीवन कौशल्य, व्यक्तिमत्व विकास व व्यसनमुक्ती प्रशिक्षणाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डायटचे प्राचार्य बी. जी. चौरे होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ अधिव्याख्याता आर. एम. रमतकर, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी कवाडे, सर्चचे व्यसनमुक्ती कार्यक्रम अधिकारी संतोष सावलकर उपस्थित होते. तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन न करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी, व्यसनमुक्तीमुळे प्रत्येक व्यक्तीचा बौद्धिक, आर्थिक, शारीरिक, मानसिक विकास साधता येतो, असेही संपदा मेहता म्हणाल्या. व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत डायटचे प्राचार्य बी. जी. चौरे यांनी विविध उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन केंद्र प्रमुख गौतम मेश्राम तर आभार ज्येष्ठ अधिव्याख्याता धनंजय चापले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. विनित मत्ते, पवन मानकर, अधिव्याख्याता प्रविणकुमार पाईकराव, प्रभारी अधीक्षक दिनेश बुरबांधे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्र प्रमुखांसह कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)