शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या व मुक्या जनावरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:40 IST

चामोर्शी : विदर्भासह गडचिरोली जिल्हा प्रचंड तापू लागला आहे. सध्या जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सियसच्या आसपास तापमान असल्याने ...

चामोर्शी : विदर्भासह गडचिरोली जिल्हा प्रचंड तापू लागला आहे. सध्या जिल्ह्यात चाळीस अंश सेल्सियसच्या आसपास तापमान असल्याने तालुक्यातील नागरिक उष्णतेने कासावीस होत आहेत तर मुक्या व भटक्या जनावरांचे चारा - पाण्याविना हाल होत आहेत. त्यामुळे मुक्या, भटक्या जनावरांसाठी पाणवठे बांधण्याची गरज निर्माण झाली आहे.

वातावरणातील तापमानात वाढ होत आहे. या उष्णतेत जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मुक्या, मोकाट जनावरांना मुबलक चारा व स्वच्छ पाणी मिळत नाही. विना चाऱ्यामुळे जनावरे अशक्त होतात, त्यांचा जीव कासावीस होतो, अशा जनावराची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. माणसांकरिता पाणपोई लावण्यासाठी बऱ्याच संघटना पुढाकार घेतात. गावातील प्रत्येक चौकाचौकात एक तरी पाणवठा बांधावा व त्यासाठी सामाजिक संस्था, ग्रामपंचायत, नगर पंचायतींनी पुढाकार घेऊन हा उपक्रम राबविल्यास मुक्या प्राण्यांना तहान भागवता येईल. उन्हाळ्यात नदी, नाले, डबके, बोअरवेल यांचे पाणी आटते. त्यामुळे जनावरांनाही पाणी मिळत नाही. नाले, ओढ्यावरील घाण पाणी पिऊन पशु रोगग्रस्त होतात. त्यासाठी मुक्या, भटक्या पशु-पक्ष्यांसाठी पाणवठे बांधून त्यांची पाण्याची सोय करणे ही काळाची गरज आहे.

बाॅक्स

मिलच्या गेटजवळ पाण्याची साेय

चामोर्शी शहरातील हनुमान नगर येथील शारदा राईस मिलचे संचालक जयसुखलाल दोषी यांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या मिलच्या गेटजवळ भटकी जनावरे व पाळीव जनावरांसाठी पाणवठा बांधून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. या पाणवठयाचा लाभ त्या मार्गांनी येणारे-जाणारे प्राणी घेत आहेत. त्यांचे अनुकरण सर्वांनी करण्याची गरज आहे.