शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
3
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
4
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
5
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
6
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
7
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
8
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
9
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
10
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
11
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
12
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
13
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
14
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
15
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
16
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
17
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
18
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
19
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
20
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

नैैसर्गिक प्रक्रियेची जागृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 00:31 IST

मासिक पाळी ही नैैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने स्त्रिला दिलेली ही एक देण आहे. परंतु समाजात मासिक पाळीविषयी अनेक अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गैैरसमज आहेत.

ठळक मुद्देपल्लवी आमटे यांचे प्रतिपादन : देसाईगंज येथे किशोरी कार्यशाळा; ३५० मुली सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : मासिक पाळी ही नैैसर्गिक प्रक्रिया आहे. निसर्गाने स्त्रिला दिलेली ही एक देण आहे. परंतु समाजात मासिक पाळीविषयी अनेक अज्ञान व अंधश्रद्धा तसेच गैैरसमज आहेत. परिणामी किशोरवयीन मुलींमध्ये वेगळीच भीती व संकोचाची भावना निर्माण होते. त्यामुळे मासिक पाळी या नैैसर्गिक प्रक्रियेबद्दल किशोरींमध्ये जाणीव जागृती करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आनंदवनच्या पल्लवी आमटे यांनी केले.देसाईगंज येथे राष्ट्रीय महिला आयोग व आरोग्य प्रबोधिनी या संस्थेच्या वतीने हटवार मंगल कार्यालयात शनिवारी आयोजित किशोरवयीन मुलींच्या कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या.कार्यशाळेत विशेष मार्गदर्शक म्हणून स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत झोडे, आहारतज्ज्ञ श्रद्धा गोटमारे, कला शिक्षक सतीश डांगे, विशेष अतिथी म्हणून जयश्री पराते, भाऊराव पत्रे, सहारे उपस्थित होत्या.कार्यक्रमाची सुरूवात संविधानाच्या ५१ क कलमातील मसुद्याच्या पोस्टरच्या औपचारिक अनावरणाने झाली. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे व विज्ञाननिष्ट दृष्टिकोन, मानवतावाद, शोधकबुद्धी व सुधारणावाद यांचा विचार करण्यासाठी हे कलम अंगिकारण्यात आले आहे. प्रास्ताविक डॉ. सूर्यप्रकाश गभणे, संचालन ओमेश्वरी पुराम तर आभार अर्चना गभणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती पुराम, पद्मजा मेहंदळे, विष्णू दुनेदार, खान, सगदेव, नाकाडे, राधिका बावनकुळे, संध्या कोवे, ए. एम. गजभिये, शर्मिला दहीकर यांनी सहकार्य केले. किशोरी कार्यशाळेत ४ जिल्ह्यातील २५ शाळा-महाविद्यालयामधून ३५० मुली सहभागी झाल्या.बदलासह शरीर विज्ञानावर मार्गदर्शनकार्यशाळेत डॉ. प्रशांत झोडे यांनी स्त्री-शरीर विज्ञान, पाळीच्या संबंधी तक्रारी याविषयी माहिती सांगून मुलींच्या अनेक शंकांचे निसरण केले. पुढील सत्रात पल्लवी आमटे यांनी स्त्री-पुरूष नैैसर्गिक लिंगभेदापासून सुरूवात करून मुलगी वयात येतानाचे बदल, मासिक पाळी म्हणजे काय, याबाबत मार्गदर्शन केले. मुला-मुलींना वयात येताना होणारे बदल सांगणे फार महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन जयश्री पराते यांनी केले. श्रद्धा गोटमारे यांनी किशोरवयीन मुलींनी आहाराबाबत जागकता बाळगावी, सर्वप्रथम पोटातील भूकेचा विचार करावा, असे मार्गदर्शन केले.