शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांनी दहशतीने केला गावकऱ्यांचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 05:00 IST

गजामेंढी येथील नागरिकांनी सांगितले की, टिपागड दलमचा नक्षलवादी सावजी तुलावी, कंपनी क्रमांक ४ चा नक्षलवादी नवलुराम तुलावी व प्लाटून क्र. ४ चा कमांडर राजा मडावी यांच्यासह जवळपास २० नक्षलवादी २० मे रोजी गावात आले. गावकऱ्यांकडून जबरजस्तीने पैसे व धान्य गोळा करून जंगलात गेले. काही वेळानंतर पुन्हा गावात येऊन आमच्यासोबत जंगलात या, अशी तंबी गावकऱ्यांना दिली.

ठळक मुद्देगजामेंढीवासीयांनी सांगितली आपबिती; नारेबाजी करत जाळले नक्षल बॅनर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : धानोरा तालुक्यातील गजामेंढी गावाजवळ २० मे रोजी नक्षलवाद्यांनी चार वाहनांना आग लावली. दोन्ही बाजूने झाडे पाडण्यासाठी नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांचा वापर केला, अशी माहिती गजामेंढीवासीयांनी दिली. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा नागरिकांनी २३ मे रोजी नक्षल बॅनर जाळून निषेध केला.गजामेंढी येथील नागरिकांनी सांगितले की, टिपागड दलमचा नक्षलवादी सावजी तुलावी, कंपनी क्रमांक ४ चा नक्षलवादी नवलुराम तुलावी व प्लाटून क्र. ४ चा कमांडर राजा मडावी यांच्यासह जवळपास २० नक्षलवादी २० मे रोजी गावात आले. गावकऱ्यांकडून जबरजस्तीने पैसे व धान्य गोळा करून जंगलात गेले. काही वेळानंतर पुन्हा गावात येऊन आमच्यासोबत जंगलात या, अशी तंबी गावकऱ्यांना दिली. जो त्यांच्यासोबत येणार नाही त्याला बंदूकीचा धाक दाखविण्यात आला. त्यामुळे एकही जण नक्षलवाद्यांना विरोध करू शकला नाही. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे गावकरी सावरगाव-मुरूमगाव मुख्य मार्गावर आले. नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस उभे करून पोलीस आल्यास माहिती देण्यास सांगीतले. त्यानंतर झाडे तोडून ४ वाहनांना आग लावली. नक्षलवाद्यांनी स्वत:च्या फायद्यासाठी आमचा ढालीसारखा वापर केला, अशी माहिती गावकऱ्यांनी दिला. नक्षलवाद्यांच्या या कृत्याचा गावकऱ्यांनी २३ मे रोजी निषेध केला. बंदुकीचा धाक दाखविणारे आमचे कैवारी होऊच शकत नाही. नक्षलवाद्यांच्या विरोधामुळे दुर्गम व आदिवासी भागाचा विकास रखडला आहे, असे सांगत नक्षलवाद्यांचे बॅनर जाळले. तसेच नक्षलवाद्यांनी जाळलेली वाहने पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या बाजुला केली.नक्षलवाद्यांच्या आमिषांना बळी पडू नकागजामेंढी येथील गावकºयांनी दाखविलेल्या हिमतीचे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कौतुक केले. तेलगू नक्षलवाद्यांच्या खोट्या आमिशाला स्थानिक आदिवासी नागरिकांनी बळी पडू नये. आजपर्यंत ज्या नक्षलवाद्यांनी पोलिसांमसोर आत्मसमर्पण केले आहे, ते सुखी व समाधानी जीवन जगत आहेत. नक्षलवाद्यांच्या नातेवाईकांनीही नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रवृत्त करावे. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ दिला जाईल, असे आवाहन एसपींनी केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी