शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांची ड्रोनमधून पोलिसांवर पाळत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 12:07 IST

Gadchiroli News नक्षलवाद्यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून पोलिसांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देबुर्गी पोलीस मदत केंद्रावरील फायरिंगने वाढविले पोलिसांचे टेन्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील बुर्गी (कांदोळी) मदत केंद्रावर रविवारी (दि.८) रात्री ८ वाजताच्या सुमारास नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. पोलिसांनीही त्या दिशेने गोळीबार करत चोख प्रत्युत्तर दिले; पण त्यानंतर आकाशात ड्रोनसदृश वस्तू फिरत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून पोलिसांच्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

आधी पोलीस मदत केंद्रासमोर असलेल्या अब्बनपल्ली आणि येमली मार्गावरून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. पोलीस जवानांनी सावध पवित्रा घेऊन जशास तसे उत्तर देऊन नक्षलींचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला. यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र त्यानंतर पोलीस मदत केंद्राच्या परिसरात आकाशात ड्रोनसदृश वस्तू फिरत असल्याचे दिसले. पोलिसांनी त्यावरही गोळीबार केला; पण अंतर जास्त असल्याने आणि पूर्ण अंधार असल्यामुळे पोलिसांची गोळी त्या वस्तूचा वेध घेऊ शकली नाही. या सर्व प्रकारामुळे पोलिसांचे टेन्शन वाढले असून, एटापल्ली तालुक्यात नक्षली अधिक सक्रिय असल्याचे यातून दिसून येत आहे.

 

एटापल्ली तालुक्यात हालचाली वाढल्या

काही महिन्यांपूर्वी बुर्गी येथील माजी उपसरपंच रामा तलांडी यांची नक्षलींनी हत्या केली होती. तसेच इरपा नामक व्यक्तीची बाजारात गोळी झाडून हत्या केली होती. गट्टा पोलीस मदत केंद्रावर हँडग्रेनेड फेकून धमाका करण्याचा नक्षलींचा प्रयत्न अयशस्वी झाला होता. नुकत्याच झालेल्या नक्षल सप्ताहात बुर्गी येथे नक्षल बॅनरही लावले होते. तालुक्यातील सुरजागड प्रकल्पाला आधीपासूनच नक्षलींचा विरोध आहे. त्यामुळे एटापल्ली तालुक्यात नक्षलींच्या हालचाली पुन्हा वाढल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी