शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
2
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
3
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
4
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
5
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
6
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
7
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
8
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
9
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
10
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
11
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
12
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
13
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
14
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
15
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
16
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
17
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
18
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
19
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!

दुर्गम भागात नक्षल्यांचे पोस्टर युद्ध सुरू

By admin | Updated: October 9, 2016 01:43 IST

: आॅपरेशन ग्रीन हन्डच्या विरोधात माओवादी संघटनांनी ५ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत सप्ताह सुरू केला आहे.

वाहतुकीवरही परिणाम : १० व ११ आॅक्टोबरला बंद पाळण्याचे आवाहनगडचिरोली : आॅपरेशन ग्रीन हन्डच्या विरोधात माओवादी संघटनांनी ५ ते ११ आॅक्टोबर या कालावधीत सप्ताह सुरू केला आहे. तर १० व ११ आॅक्टोबरला देशव्यापी बंदचे आवाहन केले आहे. यादृष्टीने दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावर नक्षल बॅनर व पोस्टर लावण्यात आले आहे. अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा, देचलीपेठा भागासह एटापल्ली तालुक्याच्या विविध भागांमध्ये नक्षलवाद्यांनी पोस्टर लावले आहे.मुलचेरा तालुक्याच्या बोलेपल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतही एटापल्ली, मुलचेरा, गडचिरोली मार्गावर रात्रीच्या सुमारास नक्षलवाद्यांनी पत्रक लावले आहे. पोलीस प्रशासनानेही नक्षलवाद्यांच्या या कारवाया लक्षात घेऊन युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे. एटापल्ली तालुक्यात परवा नक्षल व पोलिसात चकमक उडाली. दुर्गम भागात नक्षल पत्रक व बॅनर लागले असल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली असून १० व ११ तारखेला बंद पाळण्याचे आवाहन माओवाद्यांनी केले असल्यामुळे ग्रामीण भागाच्या जनजीवनावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. (लोकमत वृत्तसेवा)