शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
2
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
5
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
6
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
7
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
8
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
9
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
10
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
11
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
12
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
13
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

नाल्यांची कामे निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 23:09 IST

गडचिरोली शहरात सर्वत्र सुरू असलेल्या नाल्यांच्या बांधकामाचा दर्जा अतिशय सुमार असून त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामांमधून काही पदाधिकारी आपला आर्थिक स्वार्थ साधत आहेत. शहरात भूमिगत गटार योजना मंजूर असताना या कामावर सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी काही दिवसातच वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव : ठिकठिकाणी बांधकाम साहित्य रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरात सर्वत्र सुरू असलेल्या नाल्यांच्या बांधकामाचा दर्जा अतिशय सुमार असून त्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाच्या या कामांमधून काही पदाधिकारी आपला आर्थिक स्वार्थ साधत आहेत. शहरात भूमिगत गटार योजना मंजूर असताना या कामावर सुरू असलेली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी काही दिवसातच वाया जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.गेल्या काही महिन्यांपासून शहराच्या अनेक भागात नाल्यांच्या पुनर्बांधणीचे काम सुरू आहे. पावसाळ्याआधी हे काम उरकण्याच्या प्रयत्नात एकाच वेळी अनेक ठिकाणच्या नाल्या खोदण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणचे रस्ते अडून नागरिकांना रस्ता पार करणेही कठीण झाले आहे. नियोजनाच्या अभावामुळे आणि कोणत्याही पद्धतीने काम पूर्ण करण्याच्या नादात या कामाचा दर्जा खालावला आहे. परंतू त्याकडे नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचे साफ दुर्लक्ष आहे.वास्तविक नाल्यांचे काम करताना तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असणाºया योग्य कंत्राटदाराकडून काम होणे अपेक्षित आहे. परंतू प्रत्यक्षात कंत्राट एकाच्या नावावर आणि काम करणारा दुसराच अशी स्थिती आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांचा योग्य उतार निघालेला नाही. अशा स्थितीत खोलगट भागात पाणी साचून पावसाळ्यात नाल्यातील पाणी रस्त्यावर येणार आहे.अनेक ठिकाणी बांधकामाचे साहित्य रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा येत आहे. परंतू नगर परिषदेच्या यंत्रणेने डोळे मिटून घेतल्याने कोणाचेच कोणावर नियंत्रण नाही. अनेक रस्ते अडलेले असताना कोणत्याच ठिकाणी बांधकामाची सूचना देणारा बोर्ड दिसत नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.विशेष म्हणजे, काही ठिकाणी नाल्यांसाठी सिमेंटचे पाईप टाकले तर काही ठिकाणी पाईप न टाकताच वरून नाल्या सिमेंट काँक्रीटने झाकल्या आहे. या मागे नेमके काय कारण आहे, हे समजू शकले नाही. एकूणच या कामाची चौकशी करून सरकारी पैशाचा अपव्यय थांबविण्याची मागणी जोर धरत आहे.सरकारी पैशाचा अपव्ययगडचिरोली शहरासाठी भूमिगत गटार योजना मंजूर आहे. त्यासाठी निविदाही काढल्या होत्या. त्याला योग्य प्रतिसाद मिळाला नसला तरी पुढे हे काम होणार आहेच. असे असताना सध्या सुरू असलेला नाल्यांच्या बांधकामावरील खर्च निरर्थक आणि पैशाचा अपव्यय करणारा आहे. कमिशनबाजीचा हा खेळ बंद करावा, अशी भावना माजी नगराध्यक्ष व जि.प. सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम यांनी व्यक्त केली.