शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
2
Latest Marathi News LIVE: आशा भोसले यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात; शिवाजी पार्क स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
3
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
4
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
5
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
6
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
7
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
9
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
10
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
11
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
12
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
13
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
14
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
15
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
16
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
17
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
18
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
19
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
20
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
Daily Top 2Weekly Top 5

म्युकोपॉलीसॅक्रायडोसीस आजाराचा संशयित रूग्ण

By admin | Updated: August 14, 2014 23:43 IST

म्युकोपॉलीसॅक्रायडोसीस हा अत्यंत दुर्मिळ आजार असून या आजाराचा धानोरा तालुक्यातील मरमा या गावी संशयीत रूग्ण आढळला आहे. सदर आजार ५ लाख नागरिकांमध्ये एकाला आढळून येते.

गडचिरोली : म्युकोपॉलीसॅक्रायडोसीस हा अत्यंत दुर्मिळ आजार असून या आजाराचा धानोरा तालुक्यातील मरमा या गावी संशयीत रूग्ण आढळला आहे. सदर आजार ५ लाख नागरिकांमध्ये एकाला आढळून येते. रूग्णाच्या शरीरात निर्माण झालेली शर्करा खर्च होत नसल्याने ती पेशीमध्ये जमा होते व त्यामुळे सदर अवयव निकामी होतो. मरमा येथील ३ वर्षीय मुलीचे डोळे निकामी झाले आहेत. या आजाराच्या रूग्णाला बरा करण्यासाठी पुष्कळ खर्च येत असल्याने शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी सोसायटी फॉर ओरल कॅन्सर अ‍ॅन्ड हेल्थचे डॉ. नंदू मेश्राम यांनी दिली आहे. मरमा येथील अंम्रिका मंगलसिंग उसेंडी ही सोच या संस्थेच्या वैद्यकीय तपासणी शिबिरामध्ये आढळून आली. ती जन्मत:च अंध आहे. डोळ्यांच्या तपासणीकरिता नागपूर येथे नेण्यात आले असता, बालरोगतज्ज्ञांनी तिला म्युकोपॉलीसॅक्रायडोसीस हा आजार झाला असल्याचा संशय व्यक्त केला. या आजाराची तपासणी व उपचार नवी दिल्ली येथील एम्स या रूग्णालयातच होते. त्यामुळे या मुलीला एम्स येथे भरती करण्यात आले होते. रूग्णालयामध्ये डोळ्यांची तपासणी करून शस्त्रक्रिया त्वरित करण्याचा सल्ला दिला. या आजारासाठी बऱ्याच तपासण्या कराव्या लागणार असून त्यासाठी लागणारा खर्च लाखांच्या घरात आहे. १७ आॅगस्ट रोजी तिला एम्स रूग्णालयात भरती केले जाणार आहे. मात्र तिच्या वडीलाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने नागरिकांनी व शासनाने मदत करावी असे आवाहन डॉ. मेश्राम यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)