पेरमिली-भामरागड मुख्य रस्त्यावरून मेन रोड ते चंद्राटोलापर्यंत खडीकरण रस्ता मंजूर झाला. त्यानंतर आता सदर रस्ता बांधकामाचे भूमिपूजन जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या करण्यात आले. पावसाळ्यात येथील रस्त्यावर चिखल पसरून नागरिकांना ये-जा करताना अडचणी येतात. चिखलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम हाेण्याची शक्यता हाेती. परंतु आता येथे रस्त्याचे बांधकाम हाेणार असल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त हाेत आहे.
रस्ता भूमिपूजनप्रसंगी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, पेरमिलीच्या सरपंच किरण कोरेत, उपसरपंच सुनील सोयाम, मेडपलीचे सरपंच नीलेश वेलादी, माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोद आत्राम, अशिफ पठाण, श्रीकांत बंडामवार, कविश्वर चंदनखेडे, प्रशांत गोडसेलवार, गजानन सोयाम व नागरिक उपस्थित होते.