शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

संगणक परिचालकांचे मानधन थकले

By admin | Updated: November 11, 2014 22:40 IST

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात संपूर्ण जिल्हाभरात संगणक परिचालकांचे ५८ पदे कंत्राटी स्वरूपात मानधनावर भरण्यात आले आहेत. मात्र या संगणक परिचालकांचे

गडचिरोली : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात संपूर्ण जिल्हाभरात संगणक परिचालकांचे ५८ पदे कंत्राटी स्वरूपात मानधनावर भरण्यात आले आहेत. मात्र या संगणक परिचालकांचे माहे एप्रिल ते आॅक्टोबरदरम्यानचे तब्बल सात महिन्यांच्या कालावधीचे मानधन थकले आहे. यामुळे या संगणक परिचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने १५ नोव्हेंबरपर्यंत मानधन न दिल्यास १६ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारण्याचा इशारा अखिल भारतीय एडीईओ संघटना जिल्हा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.ईगल सिक्युरिटी अ‍ॅन्ड पर्सनल सर्व्हिसेस, मुंबई या संस्थेद्वारे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत संपूर्ण राज्यभरात अकाऊटंट कम डाडा एन्ट्री आॅपरेटरपदाच्या २ हजार २९८ जागा कंत्राटी स्वरूपात मानधनावर भरण्यात आले आहे. यापैकी गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य विभागांतर्गत असलेल्या रूग्णालयात संगणक परिचालकांच्या ५८ जागा भरण्यात आले आहे. जिल्ह्यातील कार्यरत ५८ संगणक परिचालकांना १ एप्रिल २०१४ पासून मानधन देण्यात आले नाही. मानधन तत्काळ अदा करण्यात यावे, या मागणीला घेऊन संगणक परिचालकांनी एनआरएचएमचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी डॉ. अनुपम महेश गवळी यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांनी संगणक चालकांचे समाधान केले नाही, असा आरोप संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामीण रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या संगणक आॅपरेटरच्या समस्येकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही संघटनेनी केला आहे. प्रलंबित मानधन १५ नोव्हेंबरपर्यंत अदा करण्यात यावे, अन्यथा संघटनेच्यावतीने १६ नोव्हेंबरपासून काम बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा आॅपरेटर संघटनेचे जिल्हा प्रमुख गणेश मानकर, मंगेश भोयर, पुनम सपाटे, ज्योती गेडाम, वर्षा रासेकर, कुमुद झुरे, वैशाली चन्नावार, कविता झलके, सचिन कोटरंगे, महेश कावरे, राजेश ऐत्तावार, आश्विन रंगारी, अमित भसारकर, प्रदीप सोपनकर आदी संगणक परिचालकांनी दिला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)