शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

ट्रॅव्हल्समधील कर्मचाऱ्याने केला महिलेचा विनयभंग

By admin | Updated: April 26, 2015 02:00 IST

सावली तालुक्यातील एक महिला अक्षय्य तृतीयानिमित्त आरमोरी येथे आपल्या मुलाकडे आली होती.

गडचिरोली : सावली तालुक्यातील एक महिला अक्षय्य तृतीयानिमित्त आरमोरी येथे आपल्या मुलाकडे आली होती. ती परत जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसने निघाली असता, या बसमधील कर्मचाऱ्याने बस वाकडी परिसरातील जंगलाकडे नेऊन महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार गडचिरोली पोलीस ठाण्यात २२ एप्रिल रोजी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात ३५४ (अ) (ब), ३६६, ३४२, ३२३ भादंविच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातून मूलकडे जाण्यासाठी संध्याकाळी ६.३० वाजताच्या सुमारास खासगी ट्रॅव्हल्स बस एमएच ४९ जे २३६६ निघाली. १० ते १२ महिला या गाडीत होत्या. त्यांना कोटगल गावात उतरविल्यानंतर गाडीत चालक, वाहक व एक महिला प्रवासी होते. काही दूर अंतरावर ट्रॅव्हल्समधील क्लिनर उतरून गेला. त्यानंतर सदर गाडीतील महिलेला भीती वाटत असल्याने तिने उतरण्याचा प्रयत्न केला.यावेळी चालकाने मज्जाव केला व गाडी जंगलाच्या दिशेने नेली. तेथे सदर महिलेशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तेथून महिलेने कशीबशी आपली सुटका केली. सदर जंगल परिसरातून महिला भटकत वाकडी गावात पोहोचली. तेथील पोलीस पाटलांना घटनेची हकीकत सांगितली. पोलीस पाटलांनी महिलेला गडचिरोली पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर तिथे तक्रार दाखल करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीस अटक केली नाही, अशी माहिती पीडित महिलेच्या नातेवाईकांनी दिली आहे. सदर वाहनाचा कर्मचारी चंद्रपूर येथील असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)