शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेलीतील नळांना लागणार मीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:23 IST

गडचिराेली: गडचिराेली शहरातील प्रत्येक नळाला पाणी माेजमाप करणारे मीटर लावले जाणार आहे. याची निविदा काढण्यात आली असून महिनाभरात प्रत्यक्ष ...

गडचिराेली: गडचिराेली शहरातील प्रत्येक नळाला पाणी माेजमाप करणारे मीटर लावले जाणार आहे. याची निविदा काढण्यात आली असून महिनाभरात प्रत्यक्ष मीटर लावण्याच्या कामाला सुरुवात हाेणार आहे. जेवढा पाणी वापर तेवढे पैसे माेजावे लागणार असल्याने पाण्याची बचत हाेण्यास फार माेठी मदत हाेणार आहे.

गडचिराेली शहरातील नळांना पाणी माेजमाप मीटर लावण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून नगर परिषदेमार्फत प्रयत्न केले जात हाेते. मात्र निधी नसल्याने हा प्लान पुढे ढकलला जात हाेता. अखेर नगर परिषदेने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने नगराेत्थान याेजनेतून तीन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून शहरात आता नळांना मीटर लावले जाणार आहेत. २ काेटी ९१ लाख ३३ हजार ३१० रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. नागपूर येथील वाॅटरसी साेल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला काम मिळाले आहे. शुक्रवारी नगर परिषदेची विशेष सभा पार पडली. या सभेत निविदेला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच नगर परिषदेमार्फत कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले जाऊन महिनाभरात कामाला सुरुवात हाेणार आहे.

बाॅक्स

बालटीभर पाण्यासाठी माेजावे लागणार २० पैसे

-राज्यातील बहुतांश माेठ्या शहरांमध्ये नळांना मीटर बसविण्यात आले आहेत. यात आता गडचिराेली शहराचाही समावेश हाेणार आहे. ज्या शहरांमध्ये मीटर लावण्यात आले आहेत. त्या ठिकाणी प्रती लिटर १ पैसा शुल्क आकारले जात आहे. जवळपास तेवढाच दर गडचिराेली शहरातही आकारला जाण्याची शक्यता आहे. एक बकेट जवळपास २० लिटरची राहते. तेवढे पाणी नळातून घेतल्यास २० पैसे बिलात जाेडले जाणार आहेत.

- आता वर्षाला सरसकट प्रती जाेडणी दीड हजार रुपये आकारले जात आहेत. यापुढे लाईट बिलाप्रमाणचे रीडिंग करून बिल आकारले जाईल. यात तीन, चार किंवा सहा महिन्यांनी बिल आकारले जाईल.

- बांधकाम किंवा अवैध कामासाठी पाण्याचा वापर हाेत असल्यास नगर परिषद दंड म्हणून संबंधित पाण्याचा दर त्या ग्राहकासाठी वाढवू शकते.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

नळांना लागणार आपाेआप ताेट्या

-नगर परिषदेने अनेकवेळा कारवाई करूनही नळधारक नळांना ताेट्या लावत नव्हते. त्यामुळे हजाराे लिटर पाणी वाया जात हाेते. पाणी कितीही वापरा बिल तेवढेच असल्याने नळधारक ताेट्या लावण्याकडे दुर्लक्ष करीत हाेते. आता मात्र ताेट्या लावल्याशिवाय पर्याय नाही.

- अनेक नळधारक दुसऱ्या मजल्यावर पाणी चढविण्यासाठी टिल्लू पंप लावत हाेते. आता टिल्लूपंपाचा वापर बंद हाेईल. एखादा व्यक्ती टिल्लूपंप लावत असेल तर त्याला पाण्याच्या वापरएवढे बिल द्यावे लागणार आहे.

-जे नागरिक पाण्याचा वापर कमी करतील त्यांना मात्र कमी बिल येऊन त्यांच्या पैशांची बचत हाेईल.

’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’’

सहा टप्प्यांमध्ये हाेणार काम

-नळांना मीटर लावण्यासाठी शहराचे सहा झाेन पाडण्यात आले आहेत. त्यात टप्प्याटप्प्याने मीटर लावले जाणार आहेत. संपूर्ण शहरात मीटर लावण्यात आल्यानंतर बिलाची आकारणी सुरू हाेईल.

-नगराेत्थान याेजनेतून राज्य शासनाने तीन काेटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून मीटर लावण्याचा खर्च केला जाणार आहे. जवळपास १ हजार ७०० रुपये मीटरची किंमत आहे. तर मीटर बसविण्याचा खर्च व इतर साहित्याचा खर्च जवळपास १ हजार रुपये आहे. या खर्चाचा बाेझा ग्राहकांवर लादला जाणार नाही.

काेट

काही नागरिक नळांना ताेट्या लावत नाही तर काही टिल्लू पंपांचा वापर करतात. टिल्लू पंप लावणाऱ्यांवर व ताेट्या न लावणाऱ्यांवरही नगर परिषदेने कारवाई केली मात्र नागरिकांनी पुन्हा टिल्लू पंप लावले आहेत. त्यामुळे काही नागरिकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी मिळत हाेते. याबाबत तक्रारी वाढल्या हाेत्या. नळांना मीटर बसविण्यासाठीचा प्रस्ताव नगर परिषदेने २०१७ मध्येच राज्यशासनाकडे सादर केला हाेता. त्यासाठी पाठपुरावा सुरू हाेता. मीटर बसल्याने प्रत्येकाला पाणी मिळेल.

- याेगीता पिपरे, नगराध्यक्ष, नगर परिषद, गडचिराेली