शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांची आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांशी भेट

By admin | Updated: July 2, 2015 02:06 IST

धानोरा तालुक्यातील मोहली येथील मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू करण्यात यावे, या मागणीला ...

मॉडेल स्कूल बंदचे प्रकरण : चर्चेनंतर विद्यार्थी व पालकांचे आंदोलन मागेगडचिरोली : धानोरा तालुक्यातील मोहली येथील मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू करण्यात यावे, या मागणीला घेऊन मोहली परिसरातील पाच सहा गावातील जवळपास ९६ विद्यार्थी व ३० ते ३५ पालकांनी बुधवारी सकाळी १२ वाजतापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दुपारी २ वाजताच्या सुमारास आंदोलनस्थळी येऊन विद्यार्थी व पालकांची भेट घेतली. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी आपली चर्चा झाली असून २ जुलै गुरूवारपासून जिल्ह्यातील पाचही मॉडेल स्कूल सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.त्यानंतर विद्यार्थी व पालकांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले.विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती आपण संवेदनशील आहो, शासनही आपल्या पाठिशी आहे, ठिय्या आंदोलन करण्यापूर्वी विद्यार्थी व पालकांनी आपल्याशी चर्चा करायला पाहिजे होती, चर्चेतून मार्ग काढता आला असता, मात्र तुम्ही काही राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून ठिय्या आंदोलन सुरू केले, असेही पालकमंत्री यावेळी म्हणाले. मॉडेल स्कूलचे विद्यार्थी व पालक तसेच तुमचे निवेदन माझ्यापर्यंत पोहोचले नाही. मंगळवारी आपल्याला मॉडेल स्कूलची समस्या कळली. त्यानंतर आपण तत्काळ शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधून मॉडेल स्कूल सुरू ठेवण्याची विनंती केली. याला त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे आता मॉडेल स्कूल सुरू होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री आत्राम यांनी आंदोलनकर्ते विद्यार्थी व पालकांना दिली. (स्थानिक प्रतिनिधी)