शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

४०० रुग्णांची चिकित्सा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 21:29 IST

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून आचार्य विनोबा भावे रूग्णालय सावंगी मेघे वर्धा व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त वतीने शनिवारी स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफत हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ४०० पेक्षा अधिक रूग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देउत्तम प्रतिसाद : मोफत हृदयरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकारातून आचार्य विनोबा भावे रूग्णालय सावंगी मेघे वर्धा व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त वतीने शनिवारी स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात मोफत हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात ४०० पेक्षा अधिक रूग्णांची हृदयरोग तपासणी करण्यात आली.शिबिराचे उद्घाटन आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रामुख्याने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सतिश खडसे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नागदेवते, डॉ. पोद्दार आदी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. अनिल रूडे व डॉ. सतिश खडसे यांनी रूग्णांना हृदयरोगाबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. हृदयरोग ग्रस्त रूग्णांनी कोणती काळजी घ्यावी, औषधोपचार कसा घ्यावा, याबाबतची माहिती दिली. याप्रसंगी आमदार डॉ. देवराव होळी यांनी अशा प्रकारच्या शिबिराचे आयोजन करणे आवश्यक आहे. अशा शिबिरातून सर्वसामान्य रूग्णांना आरोग्य सेवा स्थानिक स्तरावर मिळण्यास सोयीचे होते, असे सांगितले. तपासणीनंतर काही रूग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सदर शिबिरात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अनेक रूग्णांना शासनाच्या आरोग्य योजनांच्या कार्डाचे वितरण करण्यात आले.शिबिराच्या यशस्वीतेसाठी आचार्य विनोबा भावे रूग्णालय व जिल्हा सामान्य रूग्णालय गडचिरोली येथील आरोग्य कर्मचाºयांनी सहकार्य केले. सदर शिबिरात मधुमेह, बीपी, टुडीईको, इसीजी सह अनेक तपासणीची व्यवस्था पूर्णत: मोफत ठेवण्यात आली होती. तसेच एनजीओग्राफीच्या सेवेसाठी रूग्णांना शुल्कामध्ये ५० टक्के सवलतही देण्यात आली. गडचिरोली तालुक्यासह परिसरातील रूग्णांनी शिबिराचा लाभ घेतला.योजनांचा लाभ घ्याविद्यमान सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना अमलात आणली आहे. या योजनेनुसार अनेक गंभीर आजारावर मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मान्यवरांनी केले.