शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:39 IST

स्नेहा भिवाजी हिचामी (२१, रा. घोट) असे मृत तरुणीचे नाव आहे. दुपारी १.३० ते २ च्या दरम्यान स्नेहाने आपल्या ...

स्नेहा भिवाजी हिचामी (२१, रा. घोट) असे मृत तरुणीचे नाव आहे. दुपारी १.३० ते २ च्या दरम्यान स्नेहाने आपल्या घराला लागून असलेल्या रिकाम्या खोलीत पंखा लटकवायच्या हुकला नायलॉनची दोरी बांधून त्याला गळफास घेतला. ८ दिवसाआधीच या घरातून किरायेदार गेल्याने ते रिकामे होते.

स्नेहा ही चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिकत होती. तिचे वडील पोलीस विभागात कर्मचारी असून, घरात आई व एक भाऊ असे त्यांचे कुटुंब आहे. एका होतकरू मुलीच्या जीवनाचा असा शेवट होण्यामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, गावातही हळहळ व्यक्त होत आहे.

(बॉक्स)

स्नेहाला कशाचे ‘डिप्रेशन’?

आत्महत्येपूर्वी स्नेहाने खोलीतील भिंतीवर ‘डिप्रेशन’ असे इंग्रजीत लिहून ठेवले होते. यावरून तिला नैराश्य आले होते. पण, हे नैराश्य नेमके कशामुळे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. कोरोनाची स्थिती, सततचे लॉकडाऊन, त्यामुळे अभ्यासक्रमाचे बिघडलेले वेळापत्रक यामुळे आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न भंग होण्याच्या भीतीने तिला हे नैराश्य आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.