शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

वैरागड येथे बाजार समितीचे धान खरेदी केंद्र सुरू

By admin | Updated: December 26, 2015 01:34 IST

कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीच्या वतीने वैरागड येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राचा ...

क्रिष्णा गजबे यांची माहिती : मुख्यमंत्र्यांनी धानाला प्रति क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केलावैरागड : कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरीच्या वतीने वैरागड येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राचा शुभारंभ आमदार क्रिष्णा गजबे यांच्या हस्ते २५ डिसेंबर रोजी करण्यात आला.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक खिरसागर नाकाडे, उपमुख्य प्रशासक ईश्वर पासेवार, सचिव अ. द. निमजे, जिल्हा परिषद सदस्य पुनम गुरनुले, सरपंच गौरी सोमनानी, धनबाते, नत्थेखान पठाण, प्रशासक मुकेश वाघाडे आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार क्रिष्णा गजबे यांनी शेतकरी संकटात सापडला आहे. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी धानाला प्रती क्विंटल २०० रूपये बोनस जाहीर केला आहे. हा बोनस केवळ सरकारी खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन केले. समितीचे मुख्य प्रशासक खिरसागर नाकाडे म्हणाले की, आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची येथे संचयन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी मार्केट यार्ड बांधण्यात आले आहे. शेतकरी व व्यापाऱ्यांनी मागणी केल्यास आरमोरी तालुक्यात वैरागड, वडधा येथे उपबाजार घोषीत केले जाईल, अशी माहिती दिली. संचालन विनायक गरफडे तर आभार संस्थेचे सचिव अमिश निमजे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर दहीकर, माणिक धनबाते, धनंजय कुथे, अमोल ठवकर, गोवर्धन चनेकर, पुरूषोत्तम दुपारे, गिरीधर पत्रे, अक्षय बडगे, नंदू बांडेबुचे, प्रभाकर आठवले यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला वैरागड, मोहझरी, सुकाळा, विहिरगाव, लोहारा येथील धान उत्पादक शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)