शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती उमेदवारांचे सोमवारी ठरणार भाग्य

By admin | Updated: September 14, 2015 01:16 IST

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी होणार असून या निवडणुकीत उभे असलेल्या ३६ उमेदवारांचे भाग्य ठरणार आहे.

मतदान : चामोर्शी बाजार समिती निवडणूकचामोर्शी : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सोमवारी होणार असून या निवडणुकीत उभे असलेल्या ३६ उमेदवारांचे भाग्य ठरणार आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जिल्ह्यात लौकीक आहेत. चार उमेदवार अविरोध निवडून आले असून उर्वरित १४ जागांसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. सेवा सहकारी मतदार संघातून ११ उमेदवार निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी ५५६ मतदार मतदान करणार आहेत. ग्रामपंचायत मतदार संघाच्या चार जागा आहेत. त्यापैकी एक जागा अविरोध निवडून आली आहे. उर्वरित तीन जागांसाठी मतदान होणार आहे. या मतदार संघात एकूण ७८५ मतदार आहेत. हमाल मतदार संघातून एक जागा आहे. या मतदार संघात एकूण २०० मतदार मतदान करणार आहेत. सेवा सहकारी क्षेत्रातून सर्वाधिक जागा असल्याने दोन्ही पॅनलनी याच मतदार संघाकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. बाजार समितीचे माजी सभापती अतुल गण्यारपवार व माजी सभापती त्रियुगी दुबे यांचे चिरंजीव धर्मेंद्र दुबे यांनी स्वत: उमेदवारी घेऊन एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे निवडणुकीतील चुरस व रंगत आणखी वाढली असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)