शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्यांनी केला आत्मसमर्पण केलेल्या तरुणांवर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 15:55 IST

आत्मसमर्पण केलेल्या दोन तरुणांवर नक्षल्यांनीच गोळीबार करीत त्यातील एकाला ठार तर दुसऱ्याला जखमी केल्याची घटना एटापल्ली येथे मंगळवारी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: आत्मसमर्पण केलेल्या दोन तरुणांवर नक्षल्यांनीच गोळीबार करीत त्यातील एकाला ठार तर दुसऱ्याला जखमी केल्याची घटना एटापल्ली येथे मंगळवारी घडली.किशोर उर्फ मधुकर मट्टामी (३२) असे ठार झालेल्या तर अशोक होळी असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.अशोक होळी हा भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याने २०१० मध्ये पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. किशोर उर्फ मधुकर पेका मट्टामी हा नक्षल्यांच्या कंपनी क्रमांक ४ व १० मध्ये कार्यरत होता. त्याने २०१३ मध्ये आत्मसमर्पण केले होते. आत्मसमर्पण केल्यानंतर दोघेही गडचिरोलीत राहत होते. दोघेही अधूनमधून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आपापल्या गावी जात होते.९ सप्टेंबरला दोघेही आपल्या गावी गेले होते. १० सप्टेंबरला किशोर मट्टामी हा अशोक होळीच्या गावी गेला. त्यानंतर दोघेही मोटारसायकलने गडचिरोलीकडे येण्यास निघाले. दरम्यान गिलनगुडा गावानजीक नक्षल्यांनी दोघांना अडवून त्यांच्यावर गोळीबार केला. यात अशोक होळी जखमी झाला. त्याने नक्षल्यांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करीत गट्टा(जांभिया) पोलिस मदत केंद्र गाठले. पोलिसांनी त्यास हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणून जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र, किशोर उर्फ मधुकर मट्टामी हा नक्षल्यांच्या तावडीत सापडला. नक्षल्यांनी त्यास गोळ्या घालून ठार केले.या घटनेमुळे नक्षल्यांचा क्रूर चेहरा जगापुढे आल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी