शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महागाव आरोग्य केंद्र गट ‘ब’ च्या डॉक्टरवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2017 00:56 IST

येथून पाच किमी अंतरावार येत असलेल्या तसेच अहेरी व आलापल्ली या दोन मोठ्या शहरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या....

सेवा कोलमडली : ६५ हजार लोकसंख्येचा भारविवेक बेझलवार अहेरीयेथून पाच किमी अंतरावार येत असलेल्या तसेच अहेरी व आलापल्ली या दोन मोठ्या शहरांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महागाव येथील आरोग्य केंद्राचा कारभार सध्या गट ‘ब’च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर चालविला जात आहे. या रूग्णालयात इतरही आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. या रूग्णालयातील डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अहेरी येथे उपजिल्हा रूग्णालयाची निर्मिती झाल्यानंतर अहेरी पासून पाच किमी अंतरावर असलेल्या महागाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात आले. या प्राथमिक आरोग्य केंद्रात अहेरी व आलापल्ली या दोन मोठ्या गावांचा समावेश होतो. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत वेलगूर व देवलमरी ही दोन आरोग्य पथके येतात. महागाव, इंदाराम, व्यंकटरावपेठा अशी अन्य मोठी गावे या प्राथमिक आरोग्य केंद्रात मोडतात. या सगळ्या गावांची लोकसंख्या ६५ हजारांच्या जवळपास आहे. महागाव प्राथमिक आरोग्य केंद्रात गट ‘ब’ चा एकच वैद्यकीय अधिकारी आहे. डॉ. अल्का उईके यांच्याकडे सध्या प्रभार सोपविण्यात आला आहे. येथे गट ‘अ’ च्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मागील एक वर्षापासून रिक्त आहे. तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे यांना सेवाअंतर्गत स्त्री रोग व प्रसुतीशास्त्राच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आल्यानंतर डॉ. राहूल राऊत यांच्याकडे तालुका आरोग्य अधिकाऱ्याचा प्रभार सोपविण्यात आला. तेव्हापासून प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव येथील एक एमबीबीएस डॉक्टर कमी झाला. यावरची डागडुजी म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र महागाव अंतर्गत येणाऱ्या वट्रा येथील मानसेवी अधिकारी डॉ. अस्मिता गजाडीवार यांना पाठविण्यात आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र महागावची दयनिय अवस्था लक्षात घेऊन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र देचलीपेठाचे गट ‘अ’ चे वैद्यकीय अधिकारी डॉ. बिश्वास यांना प्रतीनियुक्तीवर पाठविले. डॉ. बिश्वास यांनी महागाव येथे सेवा दिलीच नाही. प्राथमिक आरोग्य केंद्र महागावमधील आरोग्य सहायीका, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, वर्ग चारची पदे रिक्त आहेत. काही कर्मचारी प्रतिनियुक्तीवर सेवा देत आहेत. यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम पडत आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राला ‘मदर पीएचसी’चा दर्जा आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राचे महत्त्व लक्षात घेता या केंद्राला गट अ चे वैद्यकीय अधिकारी देण्यात यावे, अशी मागणी आहे.इतरही कामांमुळे त्रस्तबाह्यरूग्ण विभाग, आंतररूग्ण विभाग, वित्ती व प्रशासकीय कार्य, प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांना भेटी देणे पं.स. कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व अन्य शासकीय कार्यालयांच्या बैठकींनाही उपस्थित राहावे लागते. जिल्हास्तरावरच्या बैठकांना हजेरी लावणे, आश्रमशाळा तपासणी करणे, उपजिल्हा रूग्णालयातील शस्त्रक्रिया शिबिरास भेट देण्याचे काम डॉ. अल्का उईके यांनाच सांभाळावे लागते.