शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

साडेसहा लाखांचे नुकसान

By admin | Updated: November 26, 2014 23:05 IST

गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागात २९ प्रकारचे मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी आहेत. जंगलालगत असलेल्या शेतात धुडगुस घालून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची

साडेतीन वर्षात : वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकरी हवालदिलगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पाचही वनविभागात २९ प्रकारचे मांसभक्षी व तृणभक्षी प्राणी आहेत. जंगलालगत असलेल्या शेतात धुडगुस घालून वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात धान व अन्य पिकांची नासधूस करतात. यासाठी वनविभागाने अद्यापपर्यंत ठोस उपाययोजना केली नाही. सन २०१०-११ ते २०१४ च्या सप्टेंबर अखेरपर्यंत साडेतीन वर्षाच्या कालावधीत वन्यप्राणांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे ६ लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.गडचिरोली जिल्ह्यात पाचही वनविभागात ७८ टक्के जंगल आहे. जंगलाला लागून शेकडो हेक्टर शेती आहे. या शेतामध्ये जिल्ह्यातील शेतकरी धान, सोयाबीन, कापूस, तूर, मुंग, उडीद, चना, गहू, ज्वारी आदीसह विविध प्रकारचे खरीप व रब्बी पिकांची लागवड करतात. याशिवाय कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक योजनांद्वारे सिंचनाच्या सुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अलिकडे जिल्ह्यातील शेतकरी भाजीपाला पिकांची लागवड करतात. अनेक शेतांना मजबूत स्वरूपाचे ताराचे कुंपन नाही. संरक्षणाअभावी जंगलातील रानडुकर, सांबर, हरिण आदीसह इतर वन्य प्राणी शेतात धुडगुस घालून शेतकऱ्यांच्या पिकांची नुकसान करतात. यंदा २०१४ मध्ये खरीप हंगामात अमिर्झा परिसरातील आंबेशिवणी, गिलगाव व इतर गावातील सोयाबिन पिकाची रानडुकराने मोठ्या प्रमाणात नुकसान केली होती. यासंदर्भात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अमिर्झा परिसरातील नुकसान झालेल्या पिकांचे सर्व्हेक्षण केले होते. या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सन २०१०-११ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात पीकहानीचे १९ प्रकरणे झाली. यावर्षात ६० हजार ४२० रूपयाचे वन्य प्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. २०११-१२ या वर्षात पीकहानीचे २९ प्रकरणाची नोंद वनविभागाने घेतली असून यावर्षात १ लाख ३३ हजार २५० रूपयाचे नुकसान झाले होते. २०१२-१३ या वर्षात पीकाहानीचे ८४ प्रकरणे घडली. या वर्षात शेतकऱ्यांचे ३ लाख ५१ हजार २३० रूपयाचे नुकसान झाले होते. २०१३-१४ या वर्षात सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पीकहानीचे ९ प्रकरणे घडली असून ६१ हजार १०० रूपयाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. वनविभागामार्फत पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत दिली जाते. वनविभागाच्यावतीने सन २०१०-११ ते २०१२-१३ या वर्षातील पीकहानी झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली असल्याची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्यात ७५ टक्क्याहून अधिक लोक शेती व्यवसाय करतात. जिल्ह्यात कोणतेही उद्योगधंदे नसल्याने जिल्ह्यातील नागरिकांचा उदरनिर्वाह शेती व्यवसायावर अवलंबून आहे. एकूणच गडचिरोली जिल्ह्याची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित आहे. निसर्गाचा लहरीपणा, पूर परिस्थिती, अतिवृष्टी तसेच कोरड्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच तोट्याची शेती अनुभवावी लागत आहे. अलिकडे जंगलालगतच्या शेतांमध्ये वन्यप्राण्यांच्या धुडगुसाचे प्रमाण वाढले आहे.वन्यप्राण्यांच्या धुडगुसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सदर बाब गंभीर असल्याने शासनाने कृषी विभागामार्फत आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांना १०० टक्के सवलतीवर ताराच्या कुंपनाचे वितरण करण्याची योजना हाती घ्यावी, अशी मागणी जिल्ह्यातील आदिवासी व गैरआदिवासी शेतकऱ्यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)