शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

भामरागड रूग्णालयाला कुलूप ठोकणार

By admin | Updated: April 25, 2017 00:33 IST

ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एल. जामी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवरलाल श्रुंगारे गायब झाले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : वैद्यकीय अधीक्षक गायबभामरागड : ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एल. जामी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवरलाल श्रुंगारे गायब झाले आहेत. त्यामुळे भामरागड रूग्णालयात वैद्यकीय अधिकारीच राहिलेला नाही. २४ तासाच्या आत भामरागड ग्रामीण रूग्णालयाला वैद्यकीय अधिकारी न मिळाल्यास कुलूप ठोकण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. या संदर्भात जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. लालसू नरोटे यांच्या नेतृत्वात भामरागड तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात नागरिकांनी म्हटले आहे की, भामरागड ग्रामीण रूग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नटवरलाल श्रुंगारे आहेत. पण त्यांची प्रतिनियुक्ती एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात करण्यात आली आहे. ते भामरागड येथे काम करताना आरोग्य सेवेकडे लक्षच देत नाही. सतत गैरहजर राहतात व अत्यंत बेजबाबदार आहे. त्यांची येथे परत नियुक्ती करू नये, बिनागुंंडाच्या धबधब्यावर डॉ. जामी यांचा मृत्यू झाला. त्यावेळी श्रुंगारे व पाच वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ते भामरागड मधून पसार झाले आहेत. व त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाच्या मदतीने बदली करून घेतली. ही संपूर्ण घटनाच संशयास्पद आहे. जामींची हत्याच करण्यात आली, अशी दाट शक्यता असल्याचे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी निवेदन देताना जि.प. सदस्य अ‍ॅड. लालसू नरोटे यांच्यासह सपना रामटेके चिन्ना महाका, राजेंद्र कोठारे, गोविंद चक्रवती, अक्रम पठाण, गोई कोडापे, बेबी पोरतेट आदी उपस्थित होते. या निवेदनात जामी यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआय चौकशी करावी व दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, ग्रामीण रूग्णालय भामरागड येथील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यात यावे, सर्व मानसेवी अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे, बिनागुंडा, गोंगवाडा, मिरगुळवंचा, कोठी, ताडगाव येथे मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहावे आदींसह मागण्यांचा समावेश आहे.