शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील लाॅकडाऊनमुळे कारले झाले आणखी कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:36 IST

देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला परीसरात मागील काही वर्षापासून कारले या भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत आहे. सेंद्रीय खताचा ...

देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला परीसरात मागील काही वर्षापासून कारले या भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत आहे. सेंद्रीय खताचा वापर करून सदर पिक घेतल्या जात असल्याने व येथील कारले प्रत उच्च प्रतीची असल्याने लगतच्या चंद्रपुर, गोंदिया,भंडारा,नागपुर,

गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश,तेलंगणा राज्यातुन मोठ्या प्रमाणात मागणी हाेते.

सुरुवातीला मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने येथील कारल्यांना जागेवर ४२ रुपये प्रती किलो दर मिळु लागला होता. मात्र राज्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची दिवसेंदिवस अधिकाधिक भर पडत असल्याने बाहेरच्या व्यापाऱ्यांनी येथील कारले खरेदीकडे पाठ फिरविली आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी कारल्याच्या मागणीत घट झाल्याचे सबब पुढे करत जवळपासू पंधरा रुपये प्रती किलो दराने मागणी करु लागले आहेत. कारले पिक ऐन भरात असताना होत असलेली आवक पाहुन दर पाडुन खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून हाेत आहे. बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसत असतानाच खरेदीदारांनी कारले खरेदीकडे पाठ फिरवल्याने लावलेला उत्पादन खर्चही भरून निघण्याची आशा धुसर झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकुणच होत असलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतमालाच्या हमीभावावर प्रश्न चिन्ह लावल्या जाऊ लागला आहेत.