लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज: तालुक्यातील किन्हाळा, माेहटाेला परिसरातील कारले नागरपूर येथील बाजारपेठेतून राज्याच्या अनेक भागात पाेहाेचतात. मात्र नागपूरात लाॅकडाऊन सुरू असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून कारल्यांची मागणी घटली आहे. याचा थेट परिणाम कारल्यांच्या भावावर झाला आहे. कारल्यांचे भाव गडगडल्यानें या परिसरातील शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. देसाईगंज तालुक्यातील किन्हाळा/मोहटोला परीसरात मागील काही वर्षापासून कारले या भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत आहे. सेंद्रीय खताचा वापर करून सदर पिक घेतल्या जात असल्याने व येथील कारले प्रत उच्च प्रतीची असल्याने लगतच्या चंद्रपुर, गोंदिया,भंडारा,नागपुर, गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश,तेलंगणा राज्यातुन मोठ्या प्रमाणात मागणी हाेते. सुरुवातीला मागणी जास्त आणि आवक कमी असल्याने येथील कारल्यांना जागेवर ४२ रुपये प्रती किलो दर मिळु लागला होता. मात्र राज्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची दिवसेंदिवस अधिकाधिक भर पडत असल्याने बाहेरच्या व्यापाऱ्यांनी येथील कारले खरेदीकडे पाठ फिरविली आहे. यामुळे शेतकऱ्यांना जबर फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकुणच होत असलेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
व्यापारी घेत आहेत गैरफायदास्थानिक व्यापाऱी कारल्याच्या मागणीत घट झाल्याची सबब पुढे करत जवळपास पंधरा रुपये प्रती किलो दराने मागणी करु लागले आहेत. कारले पिक ऐन भरात असताना होत असलेली आवक पाहुन दर पाडुन खरेदी करण्यात येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून हाेत आहे. बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसत असतानाच खरेदीदारांनी कारले खरेदीकडे पाठ फिरवल्याने लावलेला उत्पादन खर्चही भरून निघण्याची आशा धुसर झाली आहे.