शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पशुधन विमा पंधरवडा होणार साजरा

By admin | Updated: July 30, 2016 02:04 IST

जनावरांचा विमा उतरविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १ ते १५ आॅगस्ट या कालावधीत पशुधन विमा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे.

पशुसंवर्धन विभाग : १ ते १५ आॅगस्ट दरम्यान कार्यक्रम गडचिरोली : जनावरांचा विमा उतरविण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात १ ते १५ आॅगस्ट या कालावधीत पशुधन विमा पंधरवाडा साजरा केला जाणार आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानाअंतर्गत पशुधन विमा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत देशी, संकरीत गायी, म्हशी, पाळीव पशु, घोडे, गाढव, वळू, बैल व रेडे आणि शेळया मेंढया यांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत लाभ देण्याकरीता जास्तीत जास्त प्रती लाभार्थी प्रती कुटुंब पाच जनावरांचा समावेश आहे. विमा रक्कम ही जनावराच्या प्रत्यक्ष किमतीवर आधारीत असते. जनावरांची किंमत ही वय, स्वास्थ्य व दुध उत्पादनावर पशुपालक, पशुवैद्यकीय अधिकारी व विमा प्रतिनिधी यांच्या मार्फत निश्चित करण्यात येते. शेळ्या, मेंढ्या, डुकरे व ससे यांना लाभ द्यावयाचा झाल्यास अनुदान देय ठरविण्यासाठी एक पशुधन घटक यावर आधारीत अनुदानाचा लाभ निश्चित करण्यात आला आहे. एक पशुधन घटक म्हणजे १० शेळ्या, मेंढ्या, डुकरे, ससे आदी असे समजण्यात येते. पाच पशुधन घटकाप्रमाणे ५० शेळ्या, मेंढ्या, डुकरे, ससे यांचा लाभ देण्यात येतो. पाच पेक्षा कमी शेळया, मेंढया, डुकरे, ससे असलेल्या लाभार्र्थीना पशुधन घटक समजून या योजनेचा लाभ देण्यात येईल. अधिक माहिती करीता जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गडचिरोली यांच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)