शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सीआरपीएफतर्फे साहित्य वितरण

By admin | Updated: February 19, 2017 01:16 IST

तालुक्यातील बुर्गी येथील नागरिकांना सीआरपीएफ बटालियनच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले.

बुर्गी येथे कार्यक्रम : विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप एटापल्ली : तालुक्यातील बुर्गी येथील नागरिकांना सीआरपीएफ बटालियनच्या वतीने जीवनावश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर काही नागरिकांना स्वयंरोजगारासाठी कोंबड्या व त्यांचे खाद्य वितरित करण्यात आले. भगवंतराव प्रायमरी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य देण्यात आले. कम्युनिटी हॉलचेही उद्घाटन सीआरपीएफ बटालियनचे इन्स्पेक्टर हिरालाल मीना यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सीआरपीएफचे इतर अधिकारी जवान व स्थानिक नागरिक उपस्थित होते. या भागात रोजगाराची समस्या गंभीर असल्याने स्वयंरोजगार करता यावा, यासाठी सीआरपीएफच्या वतीने तरूणांना कोंबड्यांचे वितरण करण्यात आले. यामुळे युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध होण्यास फार मोठी मदत झाली आहे. यावेळी मार्गदर्शन करताना सीआरपीएफचे इन्स्पेक्टर हिरालाल मीना म्हणाले की, नागरिकांच्या संरक्षणाबरोबरच त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम सीआरपीएफचे जवान करीत आहेत. नक्षल्यांच्या भूलथापांना बळी न पडता, पालकांनी आपल्या पाल्याला चांगल्या दर्जाचे शिक्षण द्यावे, शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घेऊन स्वत:चा विकास करावा, नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सीआरपीएफचे जवान सदैव तयार असल्याचे मार्गदर्शन मीना यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीआरपीएफ जवानांनी सहकार्य केले.