लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : एकाच दिवशी गावातील तीन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्याने भयभित झालेल्या भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या नागरिकांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीने दिलासा मिळाला. गावकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन अधिकाऱ्यांनी त्या दुर्लक्षित गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्याची ग्वाही दिल्याने कसनासूरवासीयांचा जीव भांड्यात पडला आहे.छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेले कसनासूर हे गाव गेल्यावर्षी झालेल्या नक्षल चकमकीनंतर देशभर चर्चेत आले. या गावाला जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक शैैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हरी बालाजी, भामरागडचे तहसीलदार कैलास अंडिल यांनी १२ फेब्रुवारी रोजी काही अंतर पायी चालून गाव गाठले.गावाचा विकास करण्यासाठी शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबाजवणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. कृषी विभागामार्फत वितरित केले जाणारे शेतीचे आधुनिक साहित्य या गावकºयांना उपलब्ध करून द्यावे, वनजमिनीचे पट्टे मिळण्यासाठी वनहक्क दावे तत्काळ निकाली काढावे, आरोग्य, शिक्षण या सुविधा उपलब्ध करून द्याव्या, असे निर्देश अधिनस्त अधिकाºयांना त्यांनी दिले. त्यामुळे आपल्या गावाच्या विकासाबाबत नागरिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
कसनासूरवासीयांचा जीव भांड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 22:43 IST
एकाच दिवशी गावातील तीन नागरिकांची नक्षलवाद्यांकडून हत्या झाल्याने भयभित झालेल्या भामरागड तालुक्यातील कसनासूरच्या नागरिकांचा जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या भेटीने दिलासा मिळाला.
कसनासूरवासीयांचा जीव भांड्यात
ठळक मुद्देअधिकाऱ्यांच्या भेटीने आशा पल्लवित : योजनांचा लाभ देण्याचे आश्वासन