शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसीची उलाढाल थांबली

By admin | Updated: November 10, 2016 02:16 IST

येथील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी)च्या मुख्य शाखेत विमा हप्त्याचे प्रिमीयम भरण्यासाठी

जिल्हाभर जाणवला मोठा परिणाम : प्रिमीयम भरणारे लाखो रूपये घेऊन आल्यापावली परतलेगडचिरोली : येथील भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी)च्या मुख्य शाखेत विमा हप्त्याचे प्रिमीयम भरण्यासाठी अनेक नागरिक तसेच काही एलआयसी एजन्ट ५०० व १००० रूपयांच्या नोटांसह मोठी रोकड घेऊन आले होते. मात्र केंद्र सरकारने ५०० व १००० च्या नोटा चलनातून रद्द केल्याने एलआयसीच्या कॅशीअरने सदर नोटा कोणाकडूनही स्वीकारल्या नाही. त्यामुळे लाखो रूपयांची रोकड घेऊन अनेक नागरिक व एजन्ट आल्यापावली परतले. गडचिरोली एलआयसीच्या मुख्य शाखेत प्रिमीयमच्या माध्यमातून दररोज १२ ते १३ लाखांची उलाढाल होत असते. मात्र आज केवळ सात हजार रूपयांची रक्कमच काऊंटरवर दुपारपर्यंत जमा झाल्याची माहिती येथील कॅशीअरने लोकमतशी बोलताना दिली.एलआयसीचे गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी प्रिमीयम स्वीकृती केंद्र आहेत. या ठिकाणीही अनेक नागरिक दररोज लाखो रूपयांचे प्रिमीयम भरतात व येथील रक्कम दुपारनंतर कॉम्प्लेक्स परिसरात असलेल्या एलआयसीच्या मुख्य शाखेत जमा केली जाते. मात्र ५०० व १००० च्या नोटा रद्द झाल्याचा निर्णय शासनाने घोषीत केल्यानंतर प्रिमीयम स्वीकृती केंद्रातूनही एलआयसीच्या मुख्य शाखेत आज रोकड जमा करण्यात आली नाही. एलआयसीच्या काऊंटरवर धनादेश व डीडीद्वारे प्रिमीयम भरण्याची सुविधा नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात आली होती. केवळ १०० व ५० रूपयाच्या नोटा आणणाऱ्या ग्राहकांकडूनच त्यांचे विम्या हप्त्याचे प्रिमीयम काऊंटरवर स्वीकारण्यात आले. मात्र ५०० व १००० रूपयांच्या नोटा घेऊन आलेले अनेक ग्राहक लाखो रूपये घेऊन परत गेले. एकूणच दिवसभर एलआयसीच्या मुख्य शाखेत आर्थिक उलाढाल प्रचंड मंदावली होती.२२ हजार रूपये भरले न गेल्याने शेतकरी परतलाएलआयसीच्या विम्या हप्त्याची प्रलंबित रक्कम भरण्यासाठी गडचिरोली तालुक्याच्या ग्रामीण भागातून एका शेतकऱ्याने मंगळवारी धानाची विक्री केली. या विक्रीतून मिळालेली २२ हजार रूपयांची रोकड घेऊन सदर शेतकरी गडचिरोली येथील एलआयसीच्या मुख्य शाखेत दुपारच्या सुमारास आला होता. मात्र या शेतकऱ्याकडे ५०० व १००० रूपयांच्या नोटा असल्याने त्याचे प्रिमीयम स्वीकारण्यात आले नाही. त्यामुळे सदर शेतकरी रोकड घेऊन स्वगावी परतला.५०० व १००० रूपयाच्या नोटा प्रिमीयमसाठी ग्राहकांकडून घेऊ नयेत, अशा सूचना एलआयसीच्या विभागीय कार्यालयाकडून गडचिरोलीच्या एलआयसी कार्यालयाला सकाळीच प्राप्त झाल्या. त्यानुसार आम्ही ५०० व १००० च्या नोटा प्रिमीयमसाठी स्वीकारण्यात येणार नाही, असा फलक लावला. ज्यांच्याकडे १०० रूपयाच्या नोटा होत्या, अशा लोकांचे प्रिमीयम स्वीकारण्यात आले. मात्र ५० हजाार व एक लाख रूपयाचे प्रिमीयम भरणारे अनेक विमा एजन्ट व ग्राहक स्वत:कडील ५०० व हजारच्या नोटा असलेली रोकड परत नेली.- एस. टी. आत्राम, कॅशीअर, भारतीय जीवन विमा निगम कार्यालय गडचिरोलीकुरखेडात पेट्रोलपंप कामगाराशी वाहन चालकांचा वादकुरखेडा येथे पेट्रोलपंपावर ५०० व १००० च्या नोटा घेऊन पेट्रोल टाकण्यासाठी वाहनचालकांची मोठी गर्दी झाली होती. पेट्रोलपंप चालकाकडे चिल्लर नसल्याने ५०० रूपयांचे पेट्रोल टाकणे बंधनकारक करण्यात आले होते. यामुळे पंपावरील कामगाराशी अनेक वाहनचालकांचा वाद झाला. याबाबतची माहिती पोलीस उपनिरिक्षक कटारे यांना मिळताच त्यांनी शहरातील तिन्ही पेट्रोलपंपाना भेट देऊन ग्राहकांना परत न पाठविता दोन ते तीन ग्राहक मिळून एकत्रित पेट्रोल द्या व वाद टाळा, अशा सक्त सूचना दिल्या. दैनंदिन व्यवहारावरही केंद्र सरकारच्या या निर्णयाचा मोठा परिणाम कुरखेडा शहरात जाणवला, अशी माहिती किराणा व जनरल व्यावसायिक विवेक निरंकारी यांनी लोकमतशी बोलताना दिली. ७० ते ७५ टक्के व्यवसाय आज ठप्प होता, असेही ते म्हणाले.बीडीओंच्या मध्यस्तीनंतर एटापल्लीत नोटा स्वीकारल्या५०० व १००० रूपयांच्या नोटा शासनाने रद्द केल्याची माहिती मिळताच एटापल्ली शहरात सर्वत्र सुटे पैशासाठी अडचण जाणवू लागली. एटापल्ली शहरात पंचायत समिती प्रशासनामार्फत पेट्रोलपंप चालविला जातो. या पेट्रोलपंपावर सकाळच्या सुमारास ५०० व १००० रूपयांच्या नोटा असणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल देणे टाळले जात होते. अशा नोटा असणाऱ्या वाहनधारकांना ५०० व १००० रूपयांचे पेट्रोल टाका, असे बजाविण्यात येत होते. यामुळे पंपावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान शहरातील काही पत्रकारांनी थेट एटापल्लीचे बीडीओ इंदूरकर यांना याबाबीची माहिती दिली. बीडीओ इंदूरकर यांनी स्वत: पेट्रोलपंपावर भेट देऊन ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश दिले. त्यानंतर पेट्रोलपंपावरील तणाव कमी झाला. औषध खरेदीसाठी नागरिकांना सुट्या पैशाअभावी अडचण जाणवत होती. सुटे पैसे मागू नका, असा सूर व्यावसायिकाकडून सर्वत्र दिसून येत होता.मांस विक्री बाजाराला नोटांच्या बंदीनंतरही अच्छे दिनकोरची या छत्तीसगड सीमेला लागून असलेल्या तालुक्यात १००० व ५०० ची नोट बंद झाल्यानंतर मांस विक्री बाजाराला बुधवारी अच्छे दिन आल्याचे विचित्र चित्र दिसून आले. कोरची येथील मांस विक्री दुकानात सकाळपासूनच ग्राहकांची गर्दी होती. ५०० रूपयांचे मटन घेणाऱ्यांकडून नोट स्वीकारण्यात येत होती. तसेच बुधवार असल्याने मच्छीविक्रीचाही बाजार अतिशय तेजीत असल्याचे दिसून आले. कोरचीत ९० टक्के व्यापाऱ्यांनी ५०० व १००० ची नोट घेण्यास नकार दिला. औषधी दुकान व दवाखाण्यात या नोटा स्वीकारण्यात आल्या. बोरकर पेट्रोल पंपावरही ५०० रूपयांचे पेट्रोल वाहनधारकांना टाकावे लागले. तेव्हाच येथे नोट चालली. असे एकूण चित्र दिवसभरच होते.