शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनींना मिळणार सशक्तीकरणाचे धडे

By admin | Updated: December 30, 2014 23:34 IST

विद्यार्थिनींवर होणारे हल्ले थांबविण्याबरोबरच विद्यार्थिनींना आत्मरक्षण करता यावे, यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे सशक्तीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला असून याचा

गडचिरोली : विद्यार्थिनींवर होणारे हल्ले थांबविण्याबरोबरच विद्यार्थिनींना आत्मरक्षण करता यावे, यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे सशक्तीकरण करण्याचा उपक्रम हाती घेतला असून याचा लाभ जवळपास १० हजार विद्यार्थिनींना होणार आहे. विद्यापीठाच्यावतीने विद्यार्थिनींना औपचारिक शिक्षण दिले जाते. मात्र हे शिक्षण अडीअडचणीच्या वेळी कामात येईल, याची शाश्वती नाही. मागील काही दिवसांपासून महिलांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत. मात्र या हल्ल्यांचा सामना युवती प्रभावीपणे करू शकत नाही. हे हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यासाठी विद्यार्थिनींचे सशक्तीकरण करणे आवश्यक आहे. यासाठी भारत जैन संघटना या स्वयंसेवी संघटनेने स्वतंत्र अभ्यासक्रम तयार केला आहे. या स्वयंसेवी संघटनेचे स्वयंसेवक विद्यापीठातील विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे धडे देणार आहेत. विशेष म्हणजे भारत जैन संघटनेने हा उपक्रम नि:शुल्क स्वरूपात विद्यापीठाला उपलब्ध करून दिला आहे. गडचिरोली, चंद्रपूर व ब्रह्मपुरी येथे २३ ते २५ जानेवारी या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात महाविद्यालयातील जवळपास ५० विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थिनी महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार आहेत. विद्यापीठांतर्गत सुमारे २३० महाविद्यालय असून यामध्ये जवळपास १० हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणाचा लाभ सर्व विद्यार्थिनींना देण्याचा संकल्प गोंडवाणा विद्यापीठाने केला आहे. सदर प्रशिक्षण जीवनभर उपयोगी पडणार आहे. (नगर प्रतिनिधी)