शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या व बोकड ठार

By admin | Updated: October 22, 2015 02:05 IST

बिबट्याने गोठ्यात असलेल्या शेळ्यांच्या कळपावर खिडकीतून प्रवेश करून हल्ला केल्याने या हल्ल्यात पाच शेळ्या व

मालेवाडा : बिबट्याने गोठ्यात असलेल्या शेळ्यांच्या कळपावर खिडकीतून प्रवेश करून हल्ला केल्याने या हल्ल्यात पाच शेळ्या व एक बोकड ठार झाल्याची घटना १९ आॅक्टोबरच्या रात्री सावरगाव टोला येथे घडली. कुरखेडा तालुक्यातील बांधगाव ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सावरगाव टोला या गावाला चारही बाजुने घनदाट जंगल व डोंगराचा वेढा आहे. येथे नेहमीच हिंस्त्र पशुंचा वावर राहतो. गावाच्या सीमेवर साईनाथ मतरू वट्टी या वृध्द शेतकऱ्याचे घर आहे. घरातच हा शेतकरी शेळीपालनाचा व्यवसाय करतो. १९ च्या रात्री २ वाजतानंतर बिबट्याने गोठ्याला असलेल्या खिडकीतून प्रवेश केला व तेथे असलेल्या पाच शेळ्या व एक बोकडला ठार केले. त्यानंतर तेथून त्याने पलायन केले. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वनक्षेत्र सहायक डब्ल्यू. एस. शेंडे यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शेतकऱ्यांचे ४० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. या भागात मादी बिबट्याचे पिल्लू वावरत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. (वार्ताहर)