शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

भाडभिडी गावाला पेसा क्षेत्रातून वगळा

By admin | Updated: February 11, 2016 00:06 IST

शासनाच्या निर्देशानुसार गैरआदिवासींची संख्या ७० टक्के असल्याने भाडभिडी या गावाला पेसा कायद्यातून वगळण्यात यावे, ...

जिल्हाधिकारी कार्यालयावर दिली धडक : संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवकावरही आरोपगडचिरोली : शासनाच्या निर्देशानुसार गैरआदिवासींची संख्या ७० टक्के असल्याने भाडभिडी या गावाला पेसा कायद्यातून वगळण्यात यावे, अशी मागणी संतोष मोनी किरमे यांच्यासह ८३५ ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. दरम्यान भाडभिडी गावच्या या ग्रामस्थांनी बुधवारी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली व त्यांना याबाबतचा सर्व घटनाक्रम समजावून सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांच्या वतीने शासनाला यासंदर्भात निवेदनही देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नुकताच शासनाने ५१ टक्के पेक्षा जास्त गैरआदिवासींची संख्या असणाऱ्या गावांनी ग्रामसभेचा ठराव घेऊन पेसा कायद्यातून गाव वगळण्याबाबत निर्देश दिले आहे. भाडभिडी गावात ८३५ लोकसंख्या म्हणजे ७० टक्के लोकसंख्या ही गैरआदिवासींची आहे. शासनाने चुकीने या गावात पेसा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. याबाबत सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन तसा ठराव मांडण्याचा अनेकदा प्रयत्न केला. पण आमची लोकसंख्या जास्त असताना अनेकदा सभेत गोंधळ करून आॅक्ट्रासिटी कायद्याचा धाक दाखवून आदिवासी बांधवांनी सभा तहकूब केल्या. ६ फेब्रुवारी २०१६ रोजी झालेल्या ग्रामसभेत गैरआदिवासींच्या संख्या २०० होती तर आदिवासींची संख्या १३० होती. त्यात १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले आहेत. परंतु संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी राजकीय दबावात येऊन चुकीचा ठराव लिहिला. आदिवासी संख्या ठराव रजिस्टरवर ११३ असतानाही १३२ दाखविलेली आहे. तर आमची लोकसंख्या २०० असताना १३२ दाखविली. काहींना सह्या मारू दिल्या नाही व सह्या मारलेल्या गैरआदिवासींची संख्या १३६ असताना १२८ दाखविली आहे. संवर्ग विकास अधिकारी आदिवासी जनतेच्या बाजुने ठराव राजकीय दबावात लिहित आहे, असा आरोप या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे भाडभिडी गावाला तत्काळ पेसा कायद्यातून वगळावे, अन्यथा या गावात विकास कामे होऊ देणार नाही, असा इशारा या नागरिकांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)