शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

गळतीच्या पाण्यावर भागविली जाते तहाण

By admin | Updated: June 16, 2014 23:29 IST

कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हातपंप बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा योजनेच्या गळतीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे.

वैरागड/अहेरी : कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील हातपंप बंद असल्याने स्थानिक नागरिकांना पाणी पुरवठा योजनेच्या गळतीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करावा लागत आहे. तर अहेरी तालुक्यातील देवलमरी येथील पाणीपुरवठा योजना मागील दोन महिन्यापासून बंद असल्याने देवलमरीवासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. कढोली वॉर्ड क्रमांक ४ मध्ये जि. प. सदस्यांच्या निधीतून हातपंप मंजूर करण्यात आले आहे. मात्र उन्हाळा संपूण आता पावसाळ्याला सुरूवात झाली असतांनाही अजूनपर्यंत हातपंप खोदून देण्यात आले नाही. त्यामुळे या वार्डातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. शुद्ध व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी गावातील पाणीपुरवठा योजनेच्या व्हॉल्वचे पाणी येथील नागरिक आणत आहेत. कढोली येथे निर्माण होणारी पाण्याची टंचाई लक्षात घेऊन नदीपात्रात ज्या ठिकाणी नळ योजनेचे विहीर आहे. त्याच्या खालील भागात शिवकालीन बंधारा चुकीच्या पद्धतीने बांधण्यात आला. या बंधाऱ्याचा पाणीटंचाई निवारण्यासाठी कोणताच उपयोग झाला नाही. उलट या बंधाऱ्यामुळे नदी किणाऱ्याची फार मोठी हानी होत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात नदी किणाऱ्यावरील माती वाहून जात असल्याने नदी पात्र रूंद होत चालले आहे. यामध्ये अनेक नागरिकांच्या जमिनी नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सदर बंधारा तोडण्यात यावा, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. कढोली व खरकाडा येथे एकाचवेळी हातपंप मंजूर करण्यात आले होते. खरकाडा येथील हातपंप खोदण्यात आले. मात्र कढोली येथील हातपंप अजूनही खोदण्यात आले नाही. याकडे वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)