शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत नक्षल्यांनी पेरलेला भूसुरूंग पोलिसांनी केला निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 20:06 IST

रस्त्यालगत भूसुरूंग पेरून त्याचा स्फोट घडविण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेने उधळल्या गेला.

ठळक मुद्दे१५ किलोचा क्लेमोर माईनघातपाताचा डाव उधळला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : रस्त्यालगत भूसुरूंग पेरून त्याचा स्फोट घडविण्याचा नक्षलवाद्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेने उधळल्या गेला. भूसुरूंग पेरल्याचे वेळीच लक्षात आल्याने पोलिसांनी बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या मदतीने तो निकामी केला. भामरागड तालुक्यातील लाहेरी-धोडराज मार्गावर हा प्रकार घडला.प्राप्त माहितीनुसार, छत्तीसगड सीमेतील अबुझमाड जंगल परिसरात दि.२९ व ३० रोजी झालेल्या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचा प्रशिक्षण तळ उद्ध्वस्त करत २ नक्षलवाद्यांना ठार केले होते. त्यावेळी नक्षलवाद्यांचे साहित्य आणि दस्तावेज पोलिसांच्या हाती लागले होते. त्यावरून नक्षलवादी घातपात घडविण्याची तयारी करत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. दरम्यान भामरागड उपविभागांतर्गत येणाऱ्या लाहेरी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले असता त्या रस्त्यालगत क्लेमोर माईन पेरून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याचे वजन अंदाजे १५ किलोग्रॅम होते.गडचिरोलीवरून बॉम्ब शोधक व नाशक पथकाला तातडीने पाचारण केल्यानंतर या चमूने घटनास्थळीच तो सुरक्षितपणे निकामी केला. त्यामुळे पुन्हा एकदा नक्षल्यांचा डाव उधळल्या गेला. सदर बॉम्ब शोधून काढणाºया पथकाचे तसेच बॉम्बशोधक व नाशक पथकाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन करून त्या पथकांना पारितोषिक घोषित केले आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी