शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

भूमिअभिलेख कार्यालय समस्यांचे आगार

By admin | Updated: September 9, 2014 00:22 IST

येथील तालुका निरिक्षक भूमिअभिलेख कार्यालयात विविध समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध अडचणीचा सामना करीत जनतेचे प्रश्न सोडवावे लागत आहे. या कार्यालयात २० पैकी ७ पदे

लोमेश बुरांडे - चामोर्शीयेथील तालुका निरिक्षक भूमिअभिलेख कार्यालयात विविध समस्या आवासून उभ्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध अडचणीचा सामना करीत जनतेचे प्रश्न सोडवावे लागत आहे. या कार्यालयात २० पैकी ७ पदे रिक्त असल्याने प्रशासकीय कामावरही परिणाम होत आहे. १ आॅक्टोबर १९९४ ला तालुका भूमिअभिलेख कार्यालयाची स्थापना करण्यात आली. या कार्यालयांतर्गत तालुक्यातील २०४ गावांचा समावेश आहे. त्यानंतर उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाचे नव्याने नामकरण आॅगस्ट २०१० मध्ये करण्यात आले. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची २० पदे मंजूर आहेत. त्यापैकी अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याची १३ पदे भरलेली आहे. सात पदे रिक्त आहेत. यामध्ये सिरस्तेदार १, मुख्य सहायक १, अभिलेखापाल १, प्रतिनिधी लिपीक १, नगर भूमापन लिपीक १, भूकरमापक १, शिपाई १ अशी पदे रिक्त आहेत. या कार्यालयाकरीता स्वतंत्र पिण्याच्या पाण्यासाठी विहिर किंवा हातपंप नाही. त्यामुळे खासगी विहिरीवरून पाणी दुरून पिण्यासाठी आणावे लागते. तसेच कार्यालयात शौचालय, बाथरूम व मुत्रीघराची व्यवस्था आहे. मात्र तेथे सर्वत्र घाण पसरली आहे. संडास बाथरूमला दरवाजेही व्यवस्थीत नाही. पाण्याची सोय नसल्याने शौचालय व बाथरूममध्ये नळाचीही व्यवस्था नाही. कार्यालयात संगणक रूमची व्यवस्था नाही. इमारतीला बाहेरून संरक्षण भिंत नाही. खिडक्यांचे काच तुटलेले आहेत. इमारतीला ओलावा आला असून गेल्या काही वर्षांपासून रंगरंगोटीही झालेली नाही. तसेच पावसाळ्याच्या दिवसात इमारतीच्या स्लॅबवर पाणी जमा होऊन ते खाली भिंतीवर झिरपते. त्यामुळे भिंतीही खराब झाल्या आहेत. या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी आसनांची व्यवस्था नाही.