शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम टप्प्यातील राेवणीच्या कामांचा पावसाअभावी खाेळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात मुख्य पीक धानाचे आहे. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने राेवणीची कामे सुरू हाेण्यास विलंब झाला हाेता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा हाेती. अशाच शेतकऱ्यांनी धान राेवणीला सुरुवात केली हाेती. मात्र,  त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी राेवणीच्या कामाला सुरुवात केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : महिनाभरापूर्वी सुरू झालेली धान राेवणीची कामे अंतिम टप्प्यात पाेहाेचली आहे. फार कमी शेतकऱ्यांची धान राेवणी शिल्लक आहेत. तीही राेवणी दाेन ते तीन दिवसांत आटाेपणार आहेत. गडचिराेली जिल्ह्यात मुख्य पीक धानाचे आहे. धानाचे पऱ्हे टाकण्यासाठी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली. त्यानंतर मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने राेवणीची कामे सुरू हाेण्यास विलंब झाला हाेता. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा हाेती. अशाच शेतकऱ्यांनी धान राेवणीला सुरुवात केली हाेती. मात्र,  त्यानंतर बऱ्यापैकी पाऊस झाल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी राेवणीच्या कामाला सुरुवात केली. आता राेवणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. काही शेतकरी कमी कालावधीच्या धानाची लागवड करतात. या धानाच्या राेवणीचा कालावधी निघून गेल्याने आता या शेतकऱ्यांनी धानाची राेवणीच केली नाही. यावर्षी काही शेतकऱ्यांनी धानाच्या पेरणीचा प्रयाेग केला. हा प्रयाेग यशस्वी झाल्यास शेतकरी धानाच्या राेवणीऐवजी पेरणी करण्याकडे वळण्याची शक्यता आहे. धान राेवणीसाठी माेठ्या प्रमाणात खर्च हाेते. त्याला पेरणी हा पयार्य हाेऊ शकताे. सध्या प्रायाेगिक तत्वावर हा उपक्रम राबविला जात आहे. त्यातून उत्पादन किती हाेते, हे बघण्याची गरज आहे.

आठ दिवसांपासून पाऊस बेपत्ता

मागील आठ दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाला आहे. दिवसा कडक ऊन निघत असल्याने प्रचंड उकाडा हाेत आहे. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा संपूनही जिल्ह्यातील जलसाठे अर्धेच भरले आहेत. शेतकरी माेठ्या पावसाची प्रतीक्षा करीत आहे. कारण सप्टेंबर महिन्यापर्यंत धानाला पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे जलसाठे भरलेली असणे आवश्यक आहे. जलसाठे अर्धेच भरले असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली.

राेवणी लांबल्यास उत्पन्न घटतेधानाचे पऱ्हे टाकल्यापासून एक महिन्याच्या आत धानाची राेवणी हाेणे आवश्यक आहे. मात्र आता दाेन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात कमालीची घट हाेण्याचा अंदाज आहे.

 

टॅग्स :agricultureशेती