शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

किर्तनातून दिला शेतीचा मंत्र

By admin | Updated: September 6, 2014 23:48 IST

कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे किर्तनकार, प्रवचनकार मेळाव्याचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर

कृषी विज्ञान केंद्र : कृषी विभागाच्या योजनांची शेतकऱ्यांना दिली माहितीगडचिरोली : कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे किर्तनकार, प्रवचनकार मेळाव्याचे आयोजन ६ सप्टेंबर रोजी करण्यात आले. या मेळाव्यात शेतकऱ्यांना आधुनिक शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. मेळाव्याचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी एन. के. सोनटक्के यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. पी. लांबे होते. प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर भडांगे, उदयराव बोरावार, पिक संरक्षणचे विषय विशेषज्ञ डॉ. सुधीर बोरकर, नानाजी वाढई आदी मान्यवर उपस्थित होते. मार्गदर्शन करतांना एम. के. सोनटक्के यांनी राज्य व केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांने घेतला पाहिजे असे आवाहन केले. प्रत्येक शेतकऱ्याला अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून कृषी तंत्रज्ञानाविषयीदिली पाहिजे, जेणे करून आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर वाढण्यास मदत होईल, असे मार्गदर्शन केले. डॉ. एस. पी. लांबे यांनी किर्तनकार व प्रवचनकार हे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आपले विचार पोहोचविण्याचे अत्यंत महत्वाचे काम करतात. त्यांच्या माध्यमातून कृषीचे तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यास फार मोठी मदत झाली आहे, असे मार्गदर्शन केले. चंद्रशेखर भडांगे यांनी मार्गदर्शन करतांना शेतीमध्ये तंत्रज्ञानाचे महत्व पटवून दिले. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतीचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर पिकांची योग्य वेळी लागवड करून त्यांची योग्य काळजी घेणे शक्य होत असल्याने शेती हा फायद्याचा उद्योग ठरण्यास मदत होईल. असे झाल्यास आजपर्यंत शेतीपासून दुर गेलेला युवक शेती करू लागेल. उत्तम शेती, मध्यम रोजगार व कनिष्ठ चाकरी ही म्हण सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही, असे मार्गदर्शन केले. नानाजी वाढई यांनी संतांच्या ओव्या अभंगांमधून शेतीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन गृह विज्ञानच्या विषय विशेषज्ञ योगीता सानप तर आभार कृषी अभियांत्रिकी विषय विशेषज्ञ एस. एस. कराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग व कृषी महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)