शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कारभारात पारदर्शकता ठेवा

By admin | Updated: August 3, 2014 23:23 IST

सहकारी संस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याने अनेक संस्था डबघाईस आल्याची अनेक उदाहरणे आहेत. सहकारी संस्थांचा व्यवहार अगदी सुरळीतपणे चालण्यासाठी या संस्थांच्या कारभारात

वैरागड : सहकारी संस्थांच्या व्यवहारात पारदर्शकता नसल्याने अनेक संस्था डबघाईस आल्याची अनेक उदाहरणे आहेत. सहकारी संस्थांचा व्यवहार अगदी सुरळीतपणे चालण्यासाठी या संस्थांच्या कारभारात गतिमानता व पारदर्शकता आणावी असे आवाहन माजी खा. मारोतराव कोवासे यांनी केले.वैरागड जंगल कामगार सहकारी संस्थेच्यावतीने सन २०१० ते १२ या वर्षातील कुप अंतिम हिशोबापोटी १० टक्के समाजकल्याण अधिदान रकमेतून संस्थेच्या सभासदांना गॅसचे वितरण करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ. हरिराम वरखडे, जिल्हा कामगार सहकारी संस्थेचे जिल्हा उपाध्यक्ष पूर्णचंद्रराव रायसिडाम, जिल्हा कामगार संघाचे सचिव एम. झेड. जांभुळकर, प्रा. पी. आर. आकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख हरीष मने, नकटू पुराम, माणिक सिडाम, भाष्कर बोडणे, केशव गेडाम, सदाशिव आकरे, संस्थेचे संचालक तुकाराम जुमनाके, फागो चौके, पितांबर लांजेवार, सुखदेव बोडणे, सुनंदा वट्टी, एम. के. खोब्रागडे, श्रावण नागोसे, पोलीस पाटील गोरख भानारकर, भजन कन्नाके आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना खा. कोवासे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य सहकार क्षेत्रात आघाडीवर आहे. जे उद्योगधंदे एका व्यक्तीला स्थापन करणे शक्य होत नाही. असे उद्योग सहकाराच्या माध्यमातून स्थापन केले जाऊन अगदी यशस्वीपणे चालविले जात आहेत. मात्र यासाठी सहकारी संस्थांच्या व्यवहारामध्ये गतीमानता व पारदर्शकता असणे आवश्यक आहे. अन्यथा नागरिकांचा या संस्थांवरचा विश्वास उडल्याशिवाय राहणार नाही. जंगल कामगार सहकारी संस्थेनेही या बाबीचे भान ठेवले पाहिजे. आजपर्यंतच्या जंकासच्या व्यवहाराकडे नजर टाकल्यास पारदर्शकता असल्याचे दिसून येते. हिच पारदर्शकता समोरही ठेवावी असे आवाहन केले.प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष रामकृष्ण मडावी, अहवाल वाचन सचिव रवींद्र भुरसे, संचालन संस्थेचे सभासद प्रा. प्रदीप बोडणे यांनी केले. तर आभार डी. डी. मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुखदेव शेंद्रे, गवळीदास पंडेलगोत, जयद्रत बावनकर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)