शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या प्रचार खर्चावर अंकूश ठेवा

By admin | Updated: January 17, 2017 00:45 IST

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचनागडचिरोली : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता अधिकाऱ्यांनी निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचार खर्चावर नियंत्रण ठेवावे, तसेच आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत जिल्हाधिकारी यांच्या कक्षात सोमवारी बैठक घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी बोलत होते. सदर बैठकीला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप खवले, निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनवाणे यांच्यासह पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच निवडणुकीशी संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी नायक यांनी निवडणूक विभागाला यावेळी दिले. सदर बैठकीत जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले. संनियंत्रण समिती पुढील विषयावर आराखडा तयार करून योग्य ती कार्यवाही करणार आहे.यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, आर्थिक बळाचा दुरूपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकण्याकरिता मद्य, पैसा व इतर वस्तू वाटपांवर अंकूश ठेवणे, प्रत्येक उमेदवार व राजकीय पक्ष यांनी खर्चाबाबतची व्यवस्थित माहिती वेळेवर सादर करणे, रोख रक्कमांच्या ने-आण संदर्भात करडी नजर ठेवणे याकरिता सर्व महत्त्वाच्या ठिकाणी जसे रेल्वेस्थानक, बसस्थानक, हॉटेल, फार्म हाऊस यांच्यावर नजर ठेवणे अशा सर्व व्यवहार व हालचालीवर पूर्णत: लक्ष ठेवावे, तारण, वित्तीय हवाला दलाल यांच्यावरही नजर ठेवून बँकामार्फत होणाऱ्या मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवणे याशिवाय पेडन्यूज, सोशल कॉमेंट, सोशल मीडिया व इंटरनेट आदी बाबींवर लक्ष ठेवण्याचे काम ही संनियंत्रण समिती करणार आहे, अशी माहिती या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या बैठकीला निवडणुकीशी संबंधित अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)