शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कमलसिंह हिडामी नक्षलवादी नाहीत

By admin | Updated: August 29, 2015 00:08 IST

पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेले आमचे वडील कमलसिंह हिडामी हे नक्षलवादी नाहीत हो... असा आर्त टाहो कमलसिंहच्या मुलांनी फोडला असून, ...

मुलगी व मुलाचा दावा : जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केली तक्रारगडचिरोली : पोलिसांच्या गोळीबारात जखमी झालेले आमचे वडील कमलसिंह हिडामी हे नक्षलवादी नाहीत हो... असा आर्त टाहो कमलसिंहच्या मुलांनी फोडला असून, त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधिक्षकांकडे केली आहे.मंगळवारी २५ आॅगस्ट रोजी विशेष कृती दलाचे जवान कोरची तालुक्यातील मुरकुटी परिसरात नक्षल शोध अभियान राबवीत असताना संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास पोलीस-नक्षल चकमक उडाली. या चकमकीत कमलसिंह हिडामी जखमी झाला. नंतर पोलिसांनीच त्याला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. त्यानंतर कमलसिंह हा एरिया रक्षक दलाचा सदस्य असून, तो बोंडे येथील रहिवासी असल्याची माहिती पोलीस विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. परंतु आता कमलसिंहच्या मुलांनी आपले वडील नक्षलवादी नव्हते, त्यांचा नक्षल्यांशी कुठलाही संबंध नव्हता, असे निवेदन दिल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे.कमलसिंहचा मुलगा निलाराम हा कोरची येथील आयटीआयमध्ये कारपेंटर ट्रेडचे शिक्षण घेत असून, मुलगी राधिका नवव्या वर्गात शिकत आहे. निलाराम व राधिकाने जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही कोरची तालुक्यातील बोंडे येथील रहिवासी असून, वडील, आई व दोन बहीण-भाऊ असे चार जणांचे कुटुंब आहे. आमचे वडील कमलसिंह हिडामी हे व्यवसायाने बेलदार असून, गेल्या सहा महिन्यांपासून ते मयालघाट येथील पोलीस पाटील कमेनसिंह परसो यांच्या घराचे बांधकाम करीत आहेत. २५ आॅगस्ट रोजी ४ वाजताच्या सुमारास कमलसिंह हिडामी हे मयालघाट येथील काम आटोपून गावाकडे परत येण्यास निघाले असता, वाटेतील जंगलात सी-६० पथकाच्या जवानांनी त्यांच्यावर गोळया झाडल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता आम्हाला घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर आम्ही कोरची पोलीस ठाण्यात गेलो असता, तुमच्या वडिलांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे तेथील पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आम्ही गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेलो. परंतु तेथे तैनात पोलिसांनी आम्हाला आमच्या वडिलांना भेटू दिले नाही. यावरुन पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येते, असेही निलाराम व राधिका हिडामी यांनी म्हटले आहे.आमचे वडील निरपराध असून, ते नक्षल्यांच्या संपर्कात नव्हते. त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. असे असतानाही पोलिसांनी त्यांच्यावर गोळया का झाडल्या, असा सवाल हिडामी भावडांनी केला असून, दोषी पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)