शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयीन निर्णयाचा जि. प. निवडणुकीवर परिणाम होणार नाही

By admin | Updated: January 21, 2017 01:54 IST

गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी,

अशोक नेते यांचा दावा : पत्रकार परिषदेत दिली माहिती गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, असा निकाल उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. आमदार डॉ. होळी यांच्या विरोधात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांनी ज्यावेळी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्याचवेळी विरोधकांनी उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला होता. मात्र तत्कालीन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जाची छाननी केल्यानंतर त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकृत केला. त्यामुळे त्यांनी निवडणूक लढविली. मोठ्या फरकाने त्यांनी निवडणूक जिंकली. मात्र ज्यावेळी डॉ. होळी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, त्यावेळी त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता. ही बाब पुढे करून विरोधकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने आ. डॉ. होळी यांच्या विरोधात निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाचा निकाल ही तांत्रिक बाब आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आपण व भाजप मान ठेवून तो निर्णय मान्य केला आहे. आ. डॉ. होळी यांच्या बाजुने संपूर्ण भाजप उभा आहे. पुढील महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांवर आ. डॉ. होळी यांच्या विरोधात दिलेल्या निर्णयाचा काहीच परिणाम पडणार नाही, असा दावा खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे. पत्रकार परिषदेला आ. डॉ. देवराव होळी, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, स्वीकृत सदस्य प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, नंदू काबरा, रेखा डोळस आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी) गैरव्यवहारातून आपण निर्दोष- होळी शकुंतला मेमोरियल ट्रस्टच्या विरोधात गैरव्यवहाराचे आरोप लावण्यात आले होते. मात्र या आरोपांमधून आपली निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. निवडणुकीपूर्वी १९ आॅगस्ट २०१३ रोजी मी वैद्यकीय अधिकारी पदाचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यावर मला विधानसभेची निवडणूक लढायची आहे, असे स्पष्ट कारण नमूद केले होते. त्यामुळे माझ्या विरोधकांनी माझा राजीनामा स्वीकृत होऊ नये, यासाठी प्रयत्न केला. शकुंतला मेमोरियल ट्रस्ट व इतर लोकांविरोधात २६ सप्टेंबर २०१३ रोजी पोलिसात खोटी तक्रार दाखल केली व राजीनामा मंजुरीस अडचणी आणल्या. त्यामुळे राजीनामा स्वीकृत होण्यास विलंब झाला. कायद्यानुसार राजीनामा दिल्याच्या तारखेनंतर एका महिन्यात राजीनामा मंजूर झाला असता तर आपल्यावर ही अडचण आली नसती, अशी माहिती आ. डॉ. होळी यांनी दिली.