शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

सांडरा-अहेरी बायपास मार्गाचा प्रवास बनला खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:36 IST

अहेरी बायपास मार्गाची अशी दुरवस्था झाली आहे. गुडीगुडम : सांडरा- अहेरी बायपास मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असल्याने या ...

अहेरी बायपास मार्गाची अशी दुरवस्था झाली आहे.

गुडीगुडम : सांडरा- अहेरी बायपास मार्गावर अनेक ठिकाणी डांबरीकरण उखडले असल्याने या मार्गाचा प्रवास खडतर बनला आहे. २००४ मध्ये सदर मार्गाचे डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर दुरुस्ती करण्यात आली नाही.

सिराेंचा राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या वाहनधारकांना जवळपास सात ते आठ कि.मी. अंतर कमी पडते. तालुकास्थळी जाण्यास सोईस्कर मार्ग म्हणून या मार्गाला पसंती आहे. अहेरी तालुक्यातील रस्त्यांच्या समस्यांबाबत अजूनही वाहनधारक व नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे. कारण गडचिरोली जिल्ह्यात रस्त्याची समस्या अजूनही कायम आहे. आतापर्यंत कित्येक अधिकारी व लोकप्रतिनिधी बदलले. मात्र, रस्त्यांची समस्या जैसे थे दिसून येत आहे. याला जबाबदार कोण? रस्त्यांची समस्या सोडविण्यासाठी वाली कोण? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

सदर सांडरा बायपास अहेरी मार्ग तालुकास्थळी जाण्यास जवळचा व सोईस्कर ठरतो म्हणून बहुतांश वाहनधारक याच मार्गाचा अवलंब करतात.

सांडरा बायपास मार्गाने गेल्यास सांडरा, व्यंकटरावपेठा, गडअहेरी व अहेरी, तसेच सांडरापासून डाव्या बाजूला गेल्यास इंदाराम काटेपल्ली, देवलमरी, आवलमरी, काेटागुडा, चिंटावंटा, लंकाचेन, असे रेगुंठाकडेही याच मार्गाने जातात. या मार्गाचे डांबरीकरण उखडून गिट्टी पूर्णतः बाहेर पडली आहे. या मार्गाच्या जवळपास असलेल्या गावांतील नागरिक रस्त्यावर उखडून पडलेली गिट्टी बांधकामासाठी नेत असल्याचे चित्र दिसून आले. रस्त्याचे डांबरीकरण झाल्यापासून आतापर्यंत दुरुस्ती किंवा देखभाल न केल्याने या मार्गाची अवस्था अतिशय बिकट आहे. परिणामी, संबंधित विभागाचा कानाडोळा होत असल्याने या विभागाप्रती

रोष व्यक्त केला जात आहे. या मार्गाचे डांबरीकरण किंवा दुरुस्ती करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.