शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

जारावंडीत शाळा बंद आंदोलन

By admin | Updated: August 4, 2014 23:44 IST

आदिवासी विकास महामंडळांतर्गत सन २०१०-११ या वर्षात जारावंडी येथील ६ कोटी रूपयांचे धान्य खरेदी करण्यात आले. सदर धान्य गोदामाबाहेर ठेवल्याने चार वर्षात पूर्णत: सडून गेले आहे.

एटापल्ली : आदिवासी विकास महामंडळांतर्गत सन २०१०-११ या वर्षात जारावंडी येथील ६ कोटी रूपयांचे धान्य खरेदी करण्यात आले. सदर धान्य गोदामाबाहेर ठेवल्याने चार वर्षात पूर्णत: सडून गेले आहे. धान्य सडलेले असतांनाही धान्यांची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक व जवळ असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. महामंडळाने सडलेले धान्य त्वरित उचलावे, म्हणून गावकऱ्यांनी शाळा बंद आंदोलनास सुरूवात केली आहे. त्यामुळे शाळेत शिकणाऱ्या ३५० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.सडलेल्या धान्याची विल्हेवाट लावावी म्हणून मागील तीन वर्षांपासून नागरिकांनी वारंवार आंदोलन केले. प्रशासनाकडे धान्याची उचल करण्याबाबत वारंवार निवेदनही सादर केले. परंतु प्रशासनाने नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. सडलेल्या धान्याचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे, हे कारण समोर करून जारावंडी येथील नागरिकांनी १ आॅगस्टपासून शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला होता. परंतु पोलिसांच्या मध्यस्थीनंतर कुलूप ठोकण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. जारावंडी येथे २०१०-११ ला १ हजार क्विंटल धान खरेदी आदिवासी विकास महामंडळामार्फत करण्यात आली. परंतु सदर धान्य गोदामात न ठेवता शाळेच्या आवारात ठेवण्यात आले. त्यामुळे सडलेल्या धान्याची दुर्गंधी परिसरात पसरत होती. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागले. अनेक विद्यार्थी धानाच्या दुर्गंधीमुळे आजारीही पडले. त्यामुळे अनेक पालकांनी पाल्यांना शाळेत पाठविणेच बंद केले. शाळेजवळच अंगणवाडी, ग्रामपंचायत, वनविभाग निवासस्थान तसेच खासगी दुकान व आठवडी बाजारपेठ आहे. त्यामुळे यांनाही या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. धान्याची तीन दिवसात उचल न झाल्यास ग्रामपंचायमार्फत धान उचलून फेकले जाईल, याची सर्वस्वी जबाबदारी महामंडळाची राहील असा ठराव ग्रामसभा बोलवून नुकताच पारित करण्यात आला. शाळा बंद आंदोलनामुळे जिल्हा परिषद शाळेतील १ ते ७ पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सडलेल्या धानाची त्वरित करावी, अशी मागणी जारावंडीचे सरपंच देवनाथ सोनुले, पदाधिकारी शालिकराम गेडाम, दत्तूजी मडावी, दिलीप दास, सुरेश तलांडे, दिनेश माठे, देविदास मोहुर्ले, शरिफ पठाण, सुधाकर टेकाम यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)